सारडा विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:22 IST2021-07-22T04:22:19+5:302021-07-22T04:22:19+5:30

भंडारा : येथील सारडा महिला समाज माध्यमिक शाळेत इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ...

Pride of meritorious students in Sarda Vidyalaya | सारडा विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

सारडा विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भंडारा : येथील सारडा महिला समाज माध्यमिक शाळेत इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राचार्य, शिक्षक व पालक उपस्थित होते. इयत्ता दहावीच्या निकालात शाळेने भरीव यश संपादित केले आहे. यंदा दहावीच्या परीक्षेत एकूण ११५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यात गुणवत्ता यादीत एकूण १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्राविण्य श्रेणीत २८, तर प्रथम श्रेणीत ५९, विद्यार्थी उत्तीर्ण झाले. द्वितीय श्रेणीत १४ विद्यार्थी पास झाले आहेत. यावेळी आयोजित कार्यक्रमाला मुख्याध्यापिका वैशाली धारस्कर, ज्येष्ठ शिक्षिका श्रुती नानोटी व पालक उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विशाखा गुप्ते, सचिव नूतन मोघे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा वडनेरकर यांनी केले.

Web Title: Pride of meritorious students in Sarda Vidyalaya