आधीचे 38 टार्गेट पूर्ण; आता अठरा वर्षांपुढील सहा लक्ष नागरिकांना मिळणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 05:00 IST2021-04-24T05:00:00+5:302021-04-24T05:00:52+5:30

भंडारा जिल्ह्यात १६  जानेवारी२०२१ पासुन कोविड लसीकरणास सुरुवात झालेली असून आजपर्यत १५५०३९  लोकांना प्रथम डोज व २७३३७ लोकांना दुसरा डोज देण्यात आलेला आहे. त्यापैकी प्रथमत: कोविड आजाराशी लढा देणाऱ्या १०१५०  हेल्थ केअर वर्कर   यांना प्रथम डोज देण्यात आलेला असुन दुसरा डोज ६५९६ हेल्थ केअर वर्कसना देण्यात आलेला आहे. याशिवाय जिल्ह्यातील ९४९० फ्रन्ट लाईन बकर यांना प्रथम डोज देण्यात आलेला असुन ४८९३ फ्रन्ट लाईन वर्कर ना दुसरा डोज देण्यात आलेला आहे.

Previous 38 targets completed; Six lakh citizens will now get the vaccine in the next 18 years | आधीचे 38 टार्गेट पूर्ण; आता अठरा वर्षांपुढील सहा लक्ष नागरिकांना मिळणार लस

आधीचे 38 टार्गेट पूर्ण; आता अठरा वर्षांपुढील सहा लक्ष नागरिकांना मिळणार लस

ठळक मुद्देलसीकरणात ज्येष्ठच समोर : भक्कम जनजागृतीची गरज, नागरिकांचे सहकार्य आवश्यक

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने अधिकाधिक सुविधा उभारण्यावर भर दिला असून जिल्ह्याला अधिकचा प्राणवायू यासह लसीकरणावर अधिक भर दिला आहे. लसीकरणांतर्गत आधीचे ३८ टार्गेट पूर्ण झाले असून आता अठरा वर्षांपुढील सहा लक्ष नागरिकांना मिळणार लस देण्यात येणार आहे.
भंडारा जिल्ह्यात १६  जानेवारी२०२१ पासुन कोविड लसीकरणास सुरुवात झालेली असून आजपर्यत १५५०३९  लोकांना प्रथम डोज व २७३३७ लोकांना दुसरा डोज देण्यात आलेला आहे. त्यापैकी प्रथमत: कोविड आजाराशी लढा देणाऱ्या १०१५०  हेल्थ केअर वर्कर   यांना प्रथम डोज देण्यात आलेला असुन दुसरा डोज ६५९६ हेल्थ केअर वर्कसना देण्यात आलेला आहे. याशिवाय जिल्ह्यातील ९४९० फ्रन्ट लाईन बकर यांना प्रथम डोज देण्यात आलेला असुन ४८९३ फ्रन्ट लाईन वर्कर ना दुसरा डोज देण्यात आलेला आहे. आत १मेपासून १८ वर्षावरील व्यक्तींना लस देण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून त्या दिशेने कार्य करण्यात येत आहे.

४०,१४०  डोज शिल्लक  
 जिल्ह्यात  कोव्हीसील्ड लस १,१०,४०० डोज प्राप्त झाले  असुन त्यापैकी ८७,६७४   प्रथम डोज व १३०१२ दुसरा डोज असे एकूण १००६८६  डोज चा वापर करण्यात आलेला आहे व १९८१० डोज शिल्लक आहेत. तसेच १,२४,९०० डोज कोव्हॅक्सीन लसीचा पुरवठा झालेला असून त्यापैकी प्रथम डोज करीता ७३,९०७   डोजचा वापर करण्यात आलेला आहे व १३,१२८ दुसऱ्या डोज करीता वापर करण्यात आलला आहे व ४०,१४०  डोज त्यापैकी शिल्लक आहेत.

४५ पेक्षा जास्त वयाचे   ४० टक्केच लसीकरण
जिल्ह्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींची संख्या ३७९५३२ इतकी आहे. त्यापैकी १४५२१४ नागरिकांना पहिला डोज रत १८७०६ जणांना दुसरा डोज देण्यात आला आहे. याबाबतीत सातत्याने जनजागृती सुरू असून आता दोन्ही टप्प्यातील लसीकरणावर आरोग्य विभागाला लक्ष द्यावे लागणार आहे.

लसीकरणात ज्येष्ठ समोरच
 जिल्ह्यात कोरोना रुग्णांची सतत वाढ होत असल्यामुळे वाढत्या कोरोना बाधीत रुग्णांची सेवा करण्याकरीता मनुष्यबळ कमी पडत आहे. असे असताना जिल्ह्यात लसीकरणात ज्येष्ठ नागरीक समोर असल्याचे दिसून येते.  १८, ७०६ ज्येष्ठ नागरीकांना दुसरा डोज देण्यात आला आहे.

 

Web Title: Previous 38 targets completed; Six lakh citizens will now get the vaccine in the next 18 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.