शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षांची लागणार कसोटी !

By admin | Updated: July 19, 2015 00:44 IST

जनसामान्यांच्या कल्याणाकरिता आयुष्य झिजविण्याएवढे दुसरे कोणतेही मोठे कर्म नाही.

मुखरु बागडे पालांदूरजनसामान्यांच्या कल्याणाकरिता आयुष्य झिजविण्याएवढे दुसरे कोणतेही मोठे कर्म नाही. आपल्या हक्कातील कर्तव्याने जनसेवा करुन जीवनाचे सार्थक होणे फारच कमी लोकांना जमते. योगायोगाने बऱ्याच वर्षानंतर पालांदूर जवळील मुरमाडी (तुपकर) ला जिल्हा परिषद अध्यक्षांच्या रूपात अंबरदिवा मिळाल्याने परिसरात आनंद व्यक्त होत आहे. मागासलेपणा दूर होण्याकरिता मोठी मदत होईल, अशी आस धरीत जिल्हा परिषद अध्यक्षांना पालांदूर, पोहरा, मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या विकासाचे मोठे आवाहन उभे झाले आहे.पालांदूर गावाला पिणाच्या पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. सुरु असलेली पाणी पुरवठा तोकडी पडत असून पुरक नळयोजना अत्यंत आवश्यक आहे. जिल्हा परिषदच्या अखत्यारित असल्याने लक्ष घालून न्यायाची अपेक्षा पालांदूरवासीय करीत आहेत. पालांदूर, मुरमाडीचे अंतर केवळ आठ किमीचे आहे. दिवसातून एकही बस या मार्गावर फिरकत नाही. शेतकऱ्यांना सिंचनाकरिता एकही साधन नाही. लहान-मोठे ओढे अडवून पाणी सिंचनाकरिता दिल्यास शेतकऱ्यांना मदत होईल. खराशी-खुनारी-कोलारी या रस्त्याला मागील अनेक वर्षांपासून न्याय मिळाला नाही. रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. जिल्ह्याच्या टोकावर असल्याने व सक्षम नेतृत्व नसल्याने या भागाचा विकास पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही. आहे त्यात समाधान ठेवून परिसरातील नागरिक जीवन जगत आहेत. खुनारी गावाला विजेची गंभीर समस्या आवासून उभी आहे. सरपंच हेमंत सेलोकर यांनी वाढीव पोल मागणी करुनही मंजुर होत नाही. मुरमाडी फिडरवर कृषी विजेची समस्या भयावह आहे. वीज अभियंता तक्रारींचे निराकरण करण्यात अपयशी ठरल्याने सामान्य व्यक्तीला लाखनी-साकोली-भंडारा येथे येरझऱ्या माराव्या लागतात. जिल्हा परिषदच्या नवनियुक्त अध्यक्षा भाग्यश्री गिल्लोरकर यांचे मुरमाडी हे निवासस्थान आहे. याठिकाणी बाजाराला जागा नाही. शेतमालाला न्याय नाही. मुरमाडी हे पालांदूर पोलीस ठाण्यांतर्गत येते. त्यांच्या गावात अवैध धंदे फोफावल्याने सकाळ-सायंकाळ वर्दळीच्या ठिकाणी सभ्य व्यक्ती बसू शकत नाही. कायद्याची घडी बसविण्याकरिता जिल्हा परिषद अध्यक्षांनी पुढाकार घेऊन ठाणेदार, बिट जमादार यांना समज द्यावी लागेल. जिल्हा परिषदच्या विकास निधीतून शक्य तितके निधीची जुळवाजुळव करुन लाखनी तालुक्यातील एकमेव खुनारी शिवतीर्थला पर्यटनाचा दर्जा देऊन सौंदर्यीकरण करण्याकरिता पुढाकार घेणे महत्वाचे आहे. खुनारी- स्मशानघाट - शिवतीर्थ रस्त्याला खडीकरण गरजेचे आहे.पालांदूर वीज उपकेंद्रातूनच मुरमाडीला वीज पुरविली जाते. पालांदूर वीज केंद्राची क्षमता वाढविणे, दुतर्फा म्हणजे आसगाव-गडेगाव इथून वीज पुरविली जावी. शेतकऱ्यांना प्रलंबित वीज कनेक्शन पुरविणे, कर्मचारी संख्या वाढवावी वीज साहित्य उच्च दर्जाची असावी. यासारखी प्रलंबित वीज विभागाची कामे अध्यक्ष गिल्लोरकर यांना परिसराच्या विकासाकरिता प्राधान्याने करणे गरजेचे आहे.पोहरा जिल्हा परिषद क्षेत्र लागूनच आहे. खनिज उद्योगाला चालना देऊन पोहरा क्षेत्रातील जनतेला न्यायाची अपेक्षा आहे. बिडी उद्योगालाही चालना देण्याची गरज आहे. हे क्षेत्र जंगलव्याप्त भागात असल्याने जंगलावर आधारित रोजगार निर्मितीवर भर देवून बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त करुन द्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी बाळगली आहे. या परिसरातील जनतेने एकंदरीत पालांदूर, पोहरा, मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात विकासाची गंगा प्रवाहीत करुन जनसामान्याची आस पूर्ण करण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर यांना मतदारांनी केल्यास त्यात अतिषयोक्ती होणार नाही.