राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने सिहोराचे पोलीस निरीक्षक सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 23:40 IST2018-04-04T23:40:38+5:302018-04-04T23:40:38+5:30
सिहोरा पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले मनोहर कोरोटी यांना सहपत्नीक मुंबईत पार पडलेल्या आयोजित कार्यक्रमात राज्यपाल विद्यासागर राव यांचे हस्ते राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने सिहोराचे पोलीस निरीक्षक सन्मानित
लोकमत न्यूज नेटवर्क
सिहोरा : सिहोरा पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले मनोहर कोरोटी यांना सहपत्नीक मुंबईत पार पडलेल्या आयोजित कार्यक्रमात राज्यपाल विद्यासागर राव यांचे हस्ते राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले. यावेळी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी केंद्र शासनाने संयुक्त अभियान राबविले होते. या अभियानात छत्तीसगढ आणि महाराष्ट्राचे विशेष पोलीस कृती दलाचे पथक कार्यरत होते. महाराष्ट्र कृती दलाची जबाबदारी मनोहर कोरोटी यांचेकडे होती. सन २०१४ मध्ये या अभियानाची सुरूवात करित असताना विजापूर गावाचे हद्दीत नदी पात्रात नक्षलवाद्यांनी कृती दलाचे पथकावर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला कृती दलाच्या पथकाने प्रतीउत्तर दिले. पोलीस पथकाने गोळीबार केल्याने अनेक नक्षलवादी जंगलात पळून गेले. या चकमकीत कमांडर ठार झाला. यात अन्य दोन पुरूष नक्षलवादी व महिला नक्षलवाद्यांना ठार करण्यात कृती दलाचे पथकाला यश आले. या वर्षात नक्षलवादी विरोधात ही मोठी कारवाई ठरली होती. मृत नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलीस पथकाने ताब्यात घेतले. नक्षलवाद्यांना ठार करण्यास पथकाने शौर्य गाठल्याने २६ जानेवारी २०१६ ला मनोहर कोरोटी यांना राष्ट्रपती शौर्य पदक घोषित झाले. राज्यपाल विद्यासागर राव यांचे हस्ते पोलीस निरीक्षक मनोहर कोरोटी व त्यांची पत्नी रिना कोरोटी यांना सहपत्नीक राष्ट्रपती पोलीस शौर्य पथकाने सन्मानित करण्यात आले.