शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 05:00 IST

जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी असून १ जून ते १९ ऑगस्टपर्यंत ८९१.९ मिमी पाऊस अपेक्षित असतो. या कालावधीत ७२८.६ मिमी म्हणजे सरासरीच्या ८२ टक्के पाऊस कोसळला आहे. गत २४ तासांत २५.३ मिमी पावसाची नोंद झाली असून यात भंडारा तालुक्यात २८.४ मिमी, मोहाडी १८.७ मिमी, तुमसर १८ मिमी, पवनी १२.६ मिमी, साकोली ६० मिमी, लाखांदूर १ मिमी आणि लाखनी तालुक्यात ३८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने धानपिकाला जीवदान मिळाले असून प्रकल्पातील पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. गत २४ तासांत २५.३ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत ७२८.६ मिमी पाऊस जिल्ह्यात कोसळला. हा सरासरीच्या ८२ टक्के आहे.पावसाळ्याच्या सुरुवातीला दमदार पाऊस बरसला. शेतकऱ्यांनी नर्सरी तयार केली. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरविली. मध्यंतरी तुरळक पाऊस कोसळला. परंतु हा पाऊस रोवणीयोग्य नव्हता. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी सिंचनाची सुविधा उपलब्ध करीत रोवणी केली. मात्र पावसाचा पत्ता नव्हता. शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. अशातच मंगळवार सायंकाळपासून पावसाचे आगमन झाले. बुधवारी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळला. गुरुवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. दुपारी ३ नंतर काळ्याकुट्ट आभाळासह पाऊस बरसायला सुरुवात झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी असून १ जून ते १९ ऑगस्टपर्यंत ८९१.९ मिमी पाऊस अपेक्षित असतो. या कालावधीत ७२८.६ मिमी म्हणजे सरासरीच्या ८२ टक्के पाऊस कोसळला आहे. गत २४ तासांत २५.३ मिमी पावसाची नोंद झाली असून यात भंडारा तालुक्यात २८.४ मिमी, मोहाडी १८.७ मिमी, तुमसर १८ मिमी, पवनी १२.६ मिमी, साकोली ६० मिमी, लाखांदूर १ मिमी आणि लाखनी तालुक्यात ३८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने नदी-नाले खळखळून वाहायला लागले असून प्रकल्पातील जलसाठ्यातही वाढ होण्यास मदत होणार आहे.भंडारा शहरात गुरुवारी दुपारी जोरदार पाऊस आल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. यासोबतच साकोली, लाखनी, लाखांदूर, मोहाडी तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसाने बळीराजा सुखावला असून आणखी जोरदार पावसाची प्रतीक्षा   

गोसे प्रकल्पाचे २३ दरवाजे उघडले- पवनी : गत दोन दिवसांपासून गोसे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कोसळत असल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गुरुवारी सायंकाळी या प्रकल्पात २४३.६५० मीटर पाणीपातळी नोंदविण्यात आली. संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी या प्रकल्पाचे २३ वक्र दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. उजव्या आणि डाव्या कालव्यातून २५४९.४६५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वैनगंगा नदीपात्रात पाणीपातळीत वाढ झाली असून नदीतिरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मोहाडी-मांडेसर पूलावर तीन फूट पाणी- मोहाडी : तालुक्यात गत दोन दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत असून यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. मोहाडी ते मांडेसर दरम्यान वाहणाऱ्या नाल्यालाही पूर आला आहे. गुरुवारी या नाल्याच्या पुलावरुन तीन फूट पाणी वाहत होते. दहा ते बारा गावांचा पुरामुळे संपर्क तुटला आहे. गत पाच वर्षापासून या पुलाचे बांधकाम सुरु आहे. परंतु अद्यापही पूल पूर्णत्वास आला नाही. आणखी किती काळ लागणार हे मात्र कळायला मार्ग नाही. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती