गुढीपाडवा उत्सवाची तयारी जोमात
By Admin | Updated: March 28, 2017 00:15 IST2017-03-28T00:15:46+5:302017-03-28T00:15:46+5:30
जिल्ह्यात मराठी नववर्षाचे म्हणजे गुढीपाडवा उत्सव साजरा करण्याची तयारी जोमात सुरु आहे. शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुढीपाडवा उत्सवाची तयारी जोमात
भंडारा : जिल्ह्यात मराठी नववर्षाचे म्हणजे गुढीपाडवा उत्सव साजरा करण्याची तयारी जोमात सुरु आहे. शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पोलीस भरती प्रक्रिया सुरु असल्याने जिल्ह्यात किती ठिकाणी गुढी उभारण्यात येईल याची नेमकी आकडेवारी पोलीस विभागाकडे उपलब्ध होऊ शकली नाही.
शहरातील गांधी चौकात सकाळी ७ वाजता गुढी उभारण्यात येणार आहे. मुख्य बसस्थानकात संस्कार भारतीतर्फे नववर्षानिमित्त भव्य रांगोळी काढण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)