पाणी टंचाईवर मात करण्यासाठी युद्धस्तरावर तयारी
By Admin | Updated: May 19, 2017 00:55 IST2017-05-19T00:55:46+5:302017-05-19T00:55:46+5:30
ऐन उन्हाळ्यात नदीपात्रातील पाणी आटल्यामुळे उद्धभावलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्राम पंचायत सरपंच संजय मिरासे यांनी

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी युद्धस्तरावर तयारी
तूर्तास दिलासा अशक्य : प्रकरण वरठी येथील, सनफ्लॅग कंपनी धावली मदतीला
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : ऐन उन्हाळ्यात नदीपात्रातील पाणी आटल्यामुळे उद्धभावलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्राम पंचायत सरपंच संजय मिरासे यांनी युद्धस्तरावर काम हाती घेतले आहे. इंटेकवेल मध्ये साचलेली गाळ स्वच्छ करण्याची प्रक्रिया सुरू असून ग्रामपंचयाचे कर्मचारी दिवस रात्र कामात व्यस्त आहे.
जमिनीत ४० फूट खोल असलेल्या विहिरीत उतरून कर्मचारी गाळ उपसत असून स्वत: सरपंच यावर लक्ष ठेवून आहेत. गाळ स्वच्छ झाल्यास पाण्याचा स्तर माहीत होवून गावातील पाणीपुरवठा पूर्वरत काही प्रमाणात सुरू होऊ शकतो काय यांची पडताळणी सुरू आहे, पण पाणी टंचाईवर मात करणे तूर्तास अशक्य असल्याचे चिन्ह दिसत आहेत.
दमदार पावसाची सुरुवात होईपर्यंत वरठी वाशियाना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार हे जवळपास निशचित आहे. १५ वर्षात एकदाही न उदभवलेली परिस्थिती यावेळी पाणी टंचाईच्या रुपात ग्राम पंचायत समोर ठाकली आहे. उन्हाळ्याचे दिवस व वाढते तापमान यामुळे पाण्याची मागणी आणि उपयोग वाढते. चार दिवसांपासून वरठी येथे नळाला पाणी नाही. याबाबद सततचे फोन वाजत असून नुसता एकाच प्रश्नाचा भडिमार असे अनेक समस्यांना ग्राम पंचायतीला समोर जावे लागत आहे. नदी पात्रातील पाणी आटने ही नैसर्गिक बाब आहे. यामुळे किती प्रयत्न केले तरी पाऊस बरसल्याशिवाय किंवा नदी पात्रात धरणाचे पाणी सोडल्याशिवाय पाणी येणे शक्य नाही. धरणात पाणी नसल्यामुळे पाणी मिळणे कठीण आहे.
सलाम त्यांच्या धाडसाला
ग्राम पंचायतीचे कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्या बद्दल भावना नेहमी नकारात्मक असतात. पण दोन दिवसांपासून इंटेकवेलवर सुरू असलेले युद्धस्तरावर काम पाहून त्यांना सलाम ठोकण्याची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही. ४० फूट खोल इंटेकवेलमध्ये उतरून गाळ उपसणे सुरू आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे होणारी उष्णता किंवा इतर त्रास याबाबद खंत व्यक्त न करता ताकदीने कर्मचारी कामावर भिडले आहेत.
यात विशेष म्हणजे नुसते पाणी पुरवठा योजनेवर काम करणारे मानस नसून संपूर्ण कर्मचारी ज्यात बाबू, चपराशी, यांचा समावेश आहे. ग्राम पंचायत कर्मचारी मुकुंदा गावंडे, जितू हरडे, अरविंद वासनिक ,बाळू बोन्द्रे, वसंत बागडे, वासुदेव मते, रणजित लांजेवार, रोशन गायधने, महेंद्र बन्सोड व स्वत: सरपंच संजय मिरासे गाळ काढण्याच्या कामात व्यस्त दिसले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य रवी बोरकर, थारनोद डाकरे, रवी लांजेवार व माजी सरपंच व जिल्हा परिषद सदस्य दिलाप उके उपस्थित होते.
पावसाळ्यात टँकर भरून पाणी पुरवणारी सनफ्लॅग कंपनी पुन: एकदा वरठी ग्राम पंचायत च्या मदतीला धावून आली. इंटेकवेल मध्ये जमा होणारी गाळ काढण्यासाठी ग्राम पंचायत मध्ये यंत्र नाही. विकत घेण्यासाठी किंमत अडीच लाखाच्या घरात. अश्या परिस्तिथी ग्राम पंचायत ला गाळ उपसण्याचे यंत्र सनफ्लॅग कंपनीने उपलद्ध करून दिले आहे. त्या यंत्राच्या माध्यमातून गाळ उपसण्याचे कार्य सुरू असून अजून दोन दिवस लागणार आहेत.