सांस्कृतिक कलेचा अनमोल वारसा म्हणजे दांडिया
By Admin | Updated: October 22, 2015 00:40 IST2015-10-22T00:40:19+5:302015-10-22T00:40:19+5:30
दांडिया व गरबा हा भारतीय संस्कृती व कलेचा अनुपम वारसा आहे.

सांस्कृतिक कलेचा अनमोल वारसा म्हणजे दांडिया
भंडारावासीयांनी लुटला स्पर्र्धेचा आनंद : जय मल्हार ग्रुप अव्वल, आशिष गोंडाने यांचे प्रतिपादन
भंडारा : दांडिया व गरबा हा भारतीय संस्कृती व कलेचा अनुपम वारसा आहे. नवरात्रीच्या निमित्ताने आयोजित हा नृत्य प्रकार संपूर्ण देशात जगदंबेची आराधना म्हणून केला जातो. आबालवृद्धांपासून सर्वांनाच आवडणारा हा नृत्यप्रकार ग्लोबल झालेला आहे, असे प्रतिपादन आशिष गोंडाणे यांनी केले.
भंडाऱ्यात लोकमत सखी मंचतर्फे आयोजित जिल्हास्तरीय धमाल दांडिया स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रख्यात अभिनेता, दिग्दर्शक, नृत्य मार्गदर्शक व राज्यस्तरीय परिक्षक अनिल पालकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आशिष गोंडाणे, सदानंद निपाने, आशिष खराबे, नितीन धकाते, उर्मिला भुरे, जयेश वनेरकर, अक्षय जोशी, डॉ. अनिल कुर्वे, प्रा. निता चुटे, खुशाल निपाने, प्रणव गजभिये, संजय थोटे, सुनिल काशिवार, योगेश पडोळे व मोनु गोस्वामी उपस्थित होते.
उपस्थित पाहुण्यांनी, दांडिया स्पर्धेत सहभागी होणारे संघ राज्यस्तरावर प्रथम येणार असा आशावाद व्यक्त केला. आशु गोंडाने यांनी केले. सखी मंचच्या उपक्रमाची स्तुती करताना सांगितले की, सखी मंचद्वारे आयोजित कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी सहकार्य, उत्साह, असतो. तीच प्रेरणा समाजजागृतीचे कार्य करित आहेत. सखी मंचतर्फे आयोजित सामाजिक, सांस्कृतिक व प्रशिक्षणात्मक कार्यक्रमात महिलांना आपल्या कला गुणांना जगासमोर आणण्यासाठी एक उत्तम मंच लाभला असल्याचेही त्यांनी सांगितले. स्पर्धेत प्रथम क्रमांकाकरिता जय मल्हार संघाची निवड करण्यात आली. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व जनजागृतीचे संदेश देत स्व. नरेंंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा निषेध केला. उत्तम नृत्यकला व संदेशाने परीक्षक व प्रेक्षकांची मने जिंकुन घेतली. मोहाडी येथील साईताज ग्रुपने द्वितीय क्रमांक, भंडारा येथील देवी ग्रुपने तृतीय तर प्रोत्साहनपर मोरया ग्रुप व साकोली येथील रमाबाई ग्रुप यांची निवड करण्यात आली. स्पर्धेचे परिक्षण अनिल पालकर व नितीन धकाते यांनी केले. पालकर यांनी स्पर्धकांना प्रोत्साहन देत राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेतील नियम, अटींबद्दल मार्गदर्शन केले. संचालन जिल्हा संयोजक ललित घाटबांधे, प्रास्ताविक जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार तर आभार सोनु सुर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमात मंगलम बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स, विलासिनी आॅटोमोबाईल्स, ओम साई रेस्टारंट मुरमाडी लाखनी, त्रिमुर्ती दांडिया ग्रुप भंडारा, पॅरॉमेडिकल कॉलेज, श्री बालाजी सिस्टीम, पूर्वा लेडीज कॉर्नर यांचे सहकार्य लाभले. (मंच प्रतिनिधी)