गावकऱ्यांनी घेतली विद्यार्थ्यांची प्रार्थना
By Admin | Updated: September 23, 2016 00:42 IST2016-09-23T00:42:09+5:302016-09-23T00:42:09+5:30
बिनाखी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षक वेळेवर हजर होत नसल्याने विद्यार्थी आणि गावकरी त्रस्त झाली आहे.

गावकऱ्यांनी घेतली विद्यार्थ्यांची प्रार्थना
चुल्हाड (सिहोरा) : बिनाखी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षक वेळेवर हजर होत नसल्याने विद्यार्थी आणि गावकरी त्रस्त झाली आहे. शाळेच्या वेळेत गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांची प्रार्थना घेतल्याचा प्रकार २१ ला सकाळी ११ वाजता उघडकीस आला आहे. यामुळे शिक्षकांविषयी गावकऱ्यांत रोष निर्माण झाला आहे.
तुमसर-बपेरा राज्य मार्गावर असलेल्या दीड हजार लोकवस्तीच्या बिनाखी गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून १ ते ४ तुकड्या आहेत. या तुकड्यात ६१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शिवाय ३ शिक्षक कार्यरत आहेत. परंतु या शाळेत शालेय वेळेत शिक्षक हजर होत नाही. शाळेत विद्यार्थी ९ वाजेच्या सुमारास हजेरी लावतात. परंतु या विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवणारे कुणी राहत नाही. शाळेच्या आवारात खुली विहीर आहे. यामुळे विद्यार्थ्यांना या विहिरींचा धोका आहे. ९ ते ११ वाजेपर्यंत कुणी शिक्षक हजर होत नसल्याने दोन तास विद्यार्थी सैरवैर राहत आहे. शालेय वेळेत शिक्षक हजर होत नसल्याने एरवी विद्यार्थीच प्रार्थना होत आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून हा प्रकार शाळेत सुरू असताना शिक्षण समितीचे पदाधिकारी मुग गिळून गप्प आहेत. कार्यरत शिक्षकाचे वास्तव्य भंडारा, तुमसरात आहेत. यामुळे या शिक्षकांचे अपडावून सुरू आहे. २१ ला १० वाजेच्या सुमारास शाळेच्या आवारात शिक्षकांचे अनुपस्थितीत विद्यार्थी प्रार्थना घेतल्याचे काही गावकऱ्यांना दिसले. गावातील उपसरपंच देवेंद्र शिक्षक हजर झाले नाही. शाळा कुलूप बंद असल्याने विद्यार्थी सैर वैर खुल्या विहीर नजिक खेळत होते. ही विहीर विद्यार्थ्यांचे जिविताला धोकादायक असल्याचे कारणावरून देवेंद्र मेश्राम व प्रफुल बघेले यांनी विद्यार्थ्यांना नियमात ठेवले नंतर ११ च्या सुमारास शिक्षक शाळेत हजर झाले. उशिरा शाळेत हजेरी लावत असल्याचा जाब विचारण्यात आला असता शिक्षक शांत होते. आज गुरूवारला सुद्धा शिक्षक वेळेवर हजर झाले नसल्याने गावकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात तक्रार दिली आहे. या संदर्भात अधिक माहिती व प्रतिक्रियासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका गौरी गायधने यांना संपर्क साधले असता होवू शकला नाही.