प्रमोद नागदेवे यांना श्रमवीर पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:19 IST2018-02-20T23:19:27+5:302018-02-20T23:19:47+5:30
अशोक लेलँडचे कर्मचारी प्रमोद हरिश्चंद्र नागदेवे यांना पंतप्रधान श्रमवीर पुरस्कार घोषीत झाला असून येत्या २६ फेब्रुवारीला दिल्ली येथील विज्ञान भवनात त्यांना सन्मानित करण्यात येत आहे.

प्रमोद नागदेवे यांना श्रमवीर पुरस्कार
भंडारा : अशोक लेलँडचे कर्मचारी प्रमोद हरिश्चंद्र नागदेवे यांना पंतप्रधान श्रमवीर पुरस्कार घोषीत झाला असून येत्या २६ फेब्रुवारीला दिल्ली येथील विज्ञान भवनात त्यांना सन्मानित करण्यात येत आहे.
भारत सरकारअंतर्गत येणाऱ्या श्रम व रोजगार मंत्रालय दिल्लीतर्फे हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. कामगार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी पंतप्रधान श्रमवीर पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली होती. यापूर्वी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबईतर्फे केला जाणारा गुणवंत कामगार २००८ या पुरस्काराचे ते मानकरी ठरले होते.