वीज अभियंता, अधिकारी-कर्मचारी फोरमची कार्यकारिणी
By Admin | Updated: March 2, 2016 01:21 IST2016-03-02T01:21:22+5:302016-03-02T01:21:22+5:30
महाराष्ट्र राज्य वीज वितरण, पारेषन व निर्मिती कंपन्यातील शिपाई ते ते महाव्यवस्थापक पदापर्यंत व कनिष्ठ तंत्रज्ञ ते अधीक्षक अभियंता ...

वीज अभियंता, अधिकारी-कर्मचारी फोरमची कार्यकारिणी
भंडारा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण, पारेषन व निर्मिती कंपन्यातील शिपाई ते ते महाव्यवस्थापक पदापर्यंत व कनिष्ठ तंत्रज्ञ ते अधीक्षक अभियंता पदापर्यंत सर्व प्रवर्गातील सभासद असलेल्या बहुजन विद्युत अभियंता, अधिकारी व कर्मचारी फोरम या संघटनेच्या भंडारा मंडळातील सभासदांची बैठक भंडारा येथे रविवारला पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे उपसरचिटणीस भगवान नाईक हे होते. या बैठकीत बहुजन विद्युत अभियंता, अधिकारी व कर्मचारी फोरमची २०१६ करीता कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
भंडारा मंडळाच्या अध्यक्षपदी पी.जी. सोरते, टंकलेखक, कार्याध्यक्ष व्ही.डी. माटे, सहाय्यक लेखापाल, उपाध्यक्ष मनोज भगत, निम्नस्तर लिपीक, मंडळ सचिव, एस.एफ. धम्ममेत्ता, वरीष्ठ तंत्रज्ञ, सह सचिव ए.एन. मेश्राम, कनिष्ठ यंत्रचालक, कोषाध्यक्ष पी.डी. येसनसुरे, कार्यकारिणी सदस्य - ए.एस. केराम, राहुल रुपवते, सुधीर कळनाके, आशिष गेडाम, अश्विन वासनिक.
भंडारा विभागाच्या अध्यक्षपदी एच.डी. केवट, अनुरेखक, कार्याध्यक्ष - वाय.जे. बन्सोड, उच्चस्तर लिपीक, उपाध्यक्ष यु.बी. खवले, निम्नस्तर लिपीक, सचिव मनोज मेश्राम, निम्नस्तर लिपीक, सहसचिव ए.एस. केराम, निम्नस्तर लिपीक कोषाध्यक्ष सुधीर कळनाके, तंत्रज्ञ कार्यकारीणी सदस्य अमोल चटोले, प्रदीप कांबळे.
नूतन कार्यकारिणीचे संघटनेचे अध्यक्ष एस.आर. वायफळकर (बारामती), कार्याध्यक्ष एस.पी. कांबळे (लातूर), सचिव राजन शिन्दे (नाशिक), उपाध्यक्ष मधुकर अहिरे (नाशिक), सल्लागार डी.के. दाभाडे (नाशिक) यांनी कौतुक केले आहे. (प्रतिनिधी)