देव्हाड्यात होते कुट्टूचे वास्तव्य
By Admin | Updated: March 12, 2015 00:19 IST2015-03-12T00:19:08+5:302015-03-12T00:19:08+5:30
साकोली तालुक्यातील नागझिरा अभयारण्यातील राष्ट्रपतीसह इतर वाघांच्या शिकारप्रकरणी म्होरक्या कुट्टू छेलाल पारधी (३०) याने कबुली दिल्यानंतर...

देव्हाड्यात होते कुट्टूचे वास्तव्य
तुमसर : साकोली तालुक्यातील नागझिरा अभयारण्यातील राष्ट्रपतीसह इतर वाघांच्या शिकारप्रकरणी म्होरक्या कुट्टू छेलाल पारधी (३०) याने कबुली दिल्यानंतर सीबीआयचे पथक त्याला सोबत घेऊन मंगळवारी तुमसरातील वनपरिक्षेत्र कार्यालय, तुमसर रोड रेल्वेस्थानक तथा देव्हाडा शिवारात दाखल झाले. दोन वर्षापूर्वी कुट्टू पारधीने टोळीसह देव्हाडा शिवारात दोन तंबूतयार केले होते. यात काही काळ त्याने वास्तव्य केल्याचा खुलासा केला आहे. यामुळे वनविभागात खळबळ माजली आहे.
सीबीआय, वाईल्ड लाईफ पदाधिकारी (अमरावती) तथा नागपुरचे वनसंरक्षक मंगळवारी सकाळी १० वाजता तुमसर वनपरिक्षेत्र कार्यालयात म्होरक्या कुट्टू पारधी सह दाखल झाले. एका बंद खोलीत कुट्टूची सुमारे एक तास कसून चौकशी करण्यात आली.
देव्हाडा शिवारची माहिती कुट्टूने यावेळी दिली. पथक नंतर दुपारी १२ च्या सुमारास तुमसर रोड रेल्वे स्थानकावर दाखल झाले. तुमसर रोड रेल्वेस्थानकाच्या दक्षिण दिशेला कुट्टू पारधी रेल्वे गाडीतून दोन वर्षापूर्वी वरठी रेल्वे स्थानकावरून आला होता. नंतर एका आॅटोें तो देव्हाडा शिवारात गेला. यावेळी सर्व स्थळांची सीबीआय पथकाने व्हिडीओ चित्रीकरण केले.
देव्हाडा शिवारात दुपारी १ वाजता पथक म्होरक्या कुट्टू पारधीसह दाखल झाले. तुमसर गोंदिया व तुमसर साकोली राज्य महामार्गाजवळील आठवडी बाजार परिसरात मोठे आंब्याचे वृक्षाखाली दोन वर्षापूर्वी दोन तंबू तयार करून काही काळ टोळीने येथे वास्तव्य केल्याची कबुली कुट्टू पारधीने दिली. येथे टोळीत पैशांची वाटणी करण्यात आली. देव्हाडा ग्राम अंतर्गत हा परिसर येतो. तर तुमसर वनपरिक्षेत्राच्या सीमेत म्होरक्या कुट्टूने तंबू तयार केला होता. बहेलिया टोळी येथे वास्तव्याला होती. दुपारी दीडच्या सुामरास अशी तुमसर रोड (देव्हाडी) येथे जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात पोहचले. तिथे पथकाने भोजन केले. नंतर पथक नागपुरकडे रवाना झाल्याचे समजते. पथकासोबत तुमसर वनपरिक्षेत्राचे अधिकारी उपस्थित होते. देव्हाडा शिवारात तंबू तयार करणारे अनोळखी कोण आहेत याची खबरदारी देव्हाडा ग्रामपंचायतने घेणे येथे गरजेचे होते. हा परिसर तुमसर वनपरिक्षेत्रात येतो. (तालुका प्रतिनिधी)