राज्यमार्गावरील खड्डे नागरिकांच्या जीवावर उठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST2021-06-06T04:26:55+5:302021-06-06T04:26:55+5:30
तुमसर-कटंगी हे आंतरराज्यीय राज्य मार्ग आहे. या राज्यमार्गावरून मध्य प्रदेशकडे अनेक दुचाकी, चारचाकी वाहनांसह जड वाहनांची वर्दळ ...

राज्यमार्गावरील खड्डे नागरिकांच्या जीवावर उठले
तुमसर-कटंगी हे आंतरराज्यीय राज्य मार्ग आहे. या राज्यमार्गावरून मध्य प्रदेशकडे अनेक दुचाकी, चारचाकी वाहनांसह जड वाहनांची वर्दळ असते. त्याचबरोबर तुमसर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे दररोज कामासाठी जाणाऱ्या नागरिक व वाहनांची वर्दळ असते. परंतु, या राज्यमार्गावरील पवनारा-साखळी दरम्यान मार्गाच्या मधोमध मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत, तर कुठे रस्त्याला खोदले गेले आहे. परिणामी रस्त्याच्या मधोमध मोठी नाली तयार झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. खड्ड्यामुळे लहानसहान अपघात ही नित्याची मालिका झाली आहे. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या मार्गावरील दुरुस्तीकडे लक्ष देण्यात आले नाही.
याबाबत नागरिकांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतरही संबंधित विभाग डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे हा खड्डा नागरिकांच्या जीवावर उठला आहे. अशात एखादा मोठा अपघात झाला तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करून नागरिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर संताप व्यक्त करीत आहेत. परिणामी रस्त्यावरील खड्डा दुरुस्तीसाठी संबंधित विभागाने तत्काळ पुढाकार घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हा अध्यक्ष डॉ. सचिन बावनकर यांनी दिला आहे.