शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

सरपंच-उपसरपंचांना मिळाला स्थगनादेश

By admin | Updated: February 4, 2015 23:09 IST

ग्रामपंचायत खरबी नाका येथील सरपंच उपसरपंचासह तीन सदस्यांनी पदाचा दुरूपयोग करीत नागपूर उपायुक्तांनी सरपंच, उपसरपंचासह तीन सदस्यांचे पद खारीज केले.

जवाहरनगर / खरबी : ग्रामपंचायत खरबी नाका येथील सरपंच उपसरपंचासह तीन सदस्यांनी पदाचा दुरूपयोग करीत नागपूर उपायुक्तांनी सरपंच, उपसरपंचासह तीन सदस्यांचे पद खारीज केले. याला आवाहन देत त्यांनी स्थगनादेश प्राप्त केले.ग्रामपंचायत खरबी नाका येथील ग्रामपंचायत सदस्य सुनिता आकरे, रंजना मेश्राम व रत्नमाला वाडीभस्मे यांनी नागपूर विभागीय उपायुक्त यांच्याकडे अर्ज दाखल केले. यात साईनाथ अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजच्या नावाने नाहरकत प्रमाणपत्र हे बेकायदेशीरपणे देण्यात आले असल्याचा आरोप लावला होता. यासंबंधी अर्जदार व गैरअर्जदार यांचे युक्तीवादाचे अवलोकन केल्यानंतर ५ सप्टेंबर २०१४ अन्वये प्रकरण फेरचौकशी करीता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांचेकडे आले असता. गैरअर्जदार यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग केल्याचे निष्कर्षीत होत असल्याचा अहवाल उपायुक्तांना पाठविले. तद्नुसार अर्जदारानी लावले चार आरोपापैकी दोन आरोप सिद्ध होत असल्याचा ठपका ठेवीत गैरअर्जदार यांनी आपसी संगनमताने ही अनियमिता केली असल्याने गैरअर्जदारानी आपल्या पदाचा दुरूपयोग केला असल्याचे सिद्ध होते. या आशयाचे आदेश २२ जानेवारी २०१५ रोजी उपायुक्त पुनर्वसन नागपूर विभाग नागपूर एमएएच खान यांनी नमुद केले. याला आवाहन देत सरपंच विद्याताई मोथरकर, उपसरपंच मनोज गिरीपुंजे, ग्रामपंचायत सदस्य लता गोस्वामी, सुरेंद्र मोथरकर, वाल्मिक मोथरकर यांनी ग्रामविकास राज्य मंत्री यांच्या दालनात अपील दाखल करण्यात आली.यात सरपंच विद्या मोथरकर, उपसरपंच मनोज गिरीपुंजे, सदस्य लता गोस्वामी, सुनेंद्र मोथरकर, वाल्मिक मोथरकर यांचा समावेश होता. सखोल चौकशी करीत सरपंच उपसरपंच व इतर तीन सदस्यांना ग्रामविकास राज्यमंत्री दालनाने स्थगनादेश दिली. (वार्ताहर)