नहर रस्त्यावर खड्डेच खड्डे अपघाताची शक्यता
By Admin | Updated: October 25, 2014 22:36 IST2014-10-25T22:36:21+5:302014-10-25T22:36:21+5:30
पेंच प्रकल्प अंतर्गत असलेल्या मोहाडी तालुक्यातील सर्व प्रकारच्या नहर रस्त्यावर मुरुम टाकून नहर, रस्ते रहदारीस सुव्यवस्थित करावे, अशी मागणी रामटेक पाणीपुरवठा व्यवस्थापन समितीचे

नहर रस्त्यावर खड्डेच खड्डे अपघाताची शक्यता
पांढराबोडी : पेंच प्रकल्प अंतर्गत असलेल्या मोहाडी तालुक्यातील सर्व प्रकारच्या नहर रस्त्यावर मुरुम टाकून नहर, रस्ते रहदारीस सुव्यवस्थित करावे, अशी मागणी रामटेक पाणीपुरवठा व्यवस्थापन समितीचे संचालक विश्वनाथ कुकडे यांनी केली.
मोहाडी तालुक्यातील कांद्री, जांब, हिवरा, पाजरा, घोरपड, बोंद्री, धुसाळा, खैरलांजी, नवेगा, सकरला, काटी, आंधळगाव, सालेबर्डी, वडेगाव, कान्हळगाव, हरदोली, खमारी, खुटसावरी, नेरी, सातोना, पाचगाव, बरडी, बोथली, पारडी, मोरगा, दहेगाव, वरठी, महालगाव, अकोला टोला, सकरला, पांढराबोडी, सितेपार, पिंपळगाव, मांडेसर, सिरसोली, शिवनी, चिचोली या गावपरिसरात पेंच प्रकल्पाच्या नहरांचे जाळे पसरले असून या नहर रस्त्यावरुन शेतकऱ्यांना शेतावर बैलबडी, ट्रक्टर सह ये जा करावी लागते परंतु सदर नहर रस्त्यावर मोठमोठे खोल खड्डे पडले असून हे रस्ते मातीमोल झाले आहेत. त्यामुळे या नहर रस्त्यावर शेतकऱ्यांना अवजड वाहतुक करणे त्रासदायक ठरत असुन अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. तरिपण पेंच प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे या नहर रस्त्यांच्या दुरुस्तीकडे हेतुपूरस्पर अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने याबाबत धान उत्पादक शेतकऱ्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली असून असंतोष पसरला आहे व या असंतोषाचा भडका उडण्याच्या शक्यता नाकारता येत नाही.
याप्रकरणी पेंच प्रकल्पाच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून वेळीच दखल घेऊ न तसेच प्रत्यक्ष मोका पाहणी करुन नहर रस्त्यावर तत्काळ मुरुम टाकून नहर रस्ते रहदारीस सुव्यवस्थीत करावे अशी मागणी केली असून याकडे दुर्लक्ष केल्यास तिव्र जनआंदोलन करण्याचा इशारा संचालक विश्वनाथ कुकडे यांनी दिला आहे. मागील वर्षी देखील नहर दुरुस्तीसंदर्भात वरिष्ठांना तक्रारी करण्यात आल्या मात्र त्यांचा फायदा झाला नाही. यावर्षी तत्काळीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)