कर्तृत्वाने प्रतिष्ठा प्राप्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 23:53 IST2017-08-01T23:52:25+5:302017-08-01T23:53:01+5:30
जनता देवासारखा मान देतात. त्यांचा विश्वास गमावू नका. सर्वाेत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करा.

कर्तृत्वाने प्रतिष्ठा प्राप्त करा
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : जनता देवासारखा मान देतात. त्यांचा विश्वास गमावू नका. सर्वाेत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करा. क्षमता व मन ओतून काम करा. कामाचा बाऊ करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रत्येक गोष्टीत आनंदी व सुखी असलो पाहिजे. आपण कुठे काम करतो, कोणत्या पदावर करतो ते महत्वाचे नसते. पदाला प्रतिष्ठा प्राप्त करून देता आली पाहिजे. कर्तृत्वाने पदाला प्रतिष्ठा प्राप्त होत असते त्यासाठी इच्छाशक्ती प्रबळ असली तर डोंगरही पार करता येते,असा सल्ला जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिला.
तहसिल कार्यालय मोहाडीतर्फे बहुउद्देशिय परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडीच्या सभागृहात जिल्हास्तरावरीय महसूल दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी मंचावर अप्पर जिल्हाधिकारी प्रदीपकुमार डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) दिलीप तलमले, निवडणूक उपजिल्हाधिकारी विजय उरकुडे, जिल्हा पुरवठा अधिकारी आर.डी. भेंडे, उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, विशेष भूअर्जन अधिकारी जी.जी. जोशी, उपजिल्हाधिकारी सामान्य मुकूंद टोणगावकर, जिल्हा पूनर्वसन अधिकारी मनिषा दांडगे, भंडाराचे उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी, उपविभागीय अधिकारी तुमसर शिल्पा सोनुले, उपविभागीय अधिकारी साकोली अर्चना मोरे, तहसिलदार सुर्यकांत पाटील, गजेंद्र बालपांडे, अरविंद हिंगे, राजीव शक्करवार, संतोष महाले, जिल्हा माहिती अधिकारी गीते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
महसूल विभागात उत्कृष्ठ काम करणाºया तुमसर विभागीय अधिकारी शिल्पा सोनुले, नायब तहसिलदार सुरेश मलेवार, गजानन मेश्राम, निलेश गौंड, अव्वल कारकून धर्मराज रामटेके, राम कोहळे, आनंदराव नंदेश्वर, मंडळ अधिकारी दिलीप कावरे, नेमन तुरकर, कनिष्ठ लिपीक राजीव कांबळे, एन.एन. शर्मा, कुलेश ढोंबरे, तलाठी पराग तितिरमारे, मनोज कारेमोरे, अतुल पारधीकर, चालक नितीन बघेल, महादेव शिरपूरकर, शिपाई सुरेंद्र वैरागडे, एस.एस. कोराम, विरेंद्र काळे, कोतवाल शैलेश खंडाते, अजय कावळे तसेच तुमसर तहसिल कार्यालयातील गजानन मेश्राम, धर्मपाल रामटेके, नामदेव ठोंबरे आदींचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या व अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
महसूल दिनी संजय गांधी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे धनादेश शामकला ढबाले, वृंदा सोनवाने, पुस्तकला बोरकर, विशाखा मेश्राम, सिता बांडेबुचे, निवडणूक ओळखपत्र मनोहर मारवाडे, कमलेश तिजारे, प्रिती फुलसुंगे, अस्मिता मारवाडे, डोमेशिअल प्रमाणपत्र पौर्णिमा चोपकर, मंगेश देशमुख, खुशबू मते, प्रिती मोटघरे, आबादी पट्टा फार्म पांडूरंग किरपाने, फत्तू किरपाने, तसेच शिधापत्रिका वाटप शिला ढबाले, शिल्पा तुमसरे, पुस्तकला सेलोकर, शिला ठाकरे, झिबल धुमनखेडे, लंकेश्वर पडोळे, दीपक डोंगरे, माणिक भिवगडे यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. पदाधिकारी व कर्मचाºयांसाठी रक्तदान, आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होेते. सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
संचालन राहूल डोंगरे यांनी तर आभार प्रदर्शन तहसिलदार सुर्यकांत पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यास नायब तहसिलदार नवनाथ कातकडे यांच्यासह एकनाथ कातकडे, देविदास धुळे, अंकुश शकावरे, आनंद हट्टेवार, शिपाई सिद्धार्थ रामटेके, सव्वालाखे, शेंडे यांनी सहकार्य केले.