समाज माध्यमांचा सकारात्मक वापर काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 23:31 IST2018-03-14T23:31:13+5:302018-03-14T23:31:13+5:30

समाज माध्यम (सोशल मिडिया) संपर्काचे प्रभावी माध्यम आहे. लोकांना आपली मत मतांतरे व्यक्त करण्याचा हा महत्वाचा प्लॅटफॉर्म असून तरुण पिढी समाज माध्यमांचा मोठया प्रमाणात वापर करीत आहे.

Positive use of social media needs time | समाज माध्यमांचा सकारात्मक वापर काळाची गरज

समाज माध्यमांचा सकारात्मक वापर काळाची गरज

ठळक मुद्देदिलीप तलमले : सोशल मीडिया महामित्र उपक्रम

आॅनलाईन लोकमत
भंडारा : समाज माध्यम (सोशल मिडिया) संपर्काचे प्रभावी माध्यम आहे. लोकांना आपली मत मतांतरे व्यक्त करण्याचा हा महत्वाचा प्लॅटफॉर्म असून तरुण पिढी समाज माध्यमांचा मोठया प्रमाणात वापर करीत आहे. मात्र अनेकवेळा समाज माध्यमांचा चुकीच्या पोस्ट शेअर करण्यासाठी वापर होतांना दिसतो. अशा परिस्थितीत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सोशल मिडिया महामित्र हा उपक्रम राबवून जागृतीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. समाज माध्यमांचा वापर सकारात्मकरीत्या करणे काळाची गरज असून समाज माध्यमाच्या सकारात्मक वापरातूनच विवेकी समाज निर्माण होईल, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर सोशल मिडिया महामित्र उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सोशल मिडिया संवाद सत्राचे आयोजन स्टार रोजगार व स्वयंरोजगार संस्था भंडारा येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी विजय उरकुडे, अग्रणी बँक व्यवस्थापक आर. एस. खांडेकर, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, कोषागार अधिकारी अमित मेश्राम, एनआयसीचे डिआयओ संदिप लोखंडे व सतिश ठाकरे यावेळी उपस्थित होते.
सोशल मिडियाचा होणार दुरुपयोग टाळण्यासाठी व त्याच्या योग्य उपयोगासाठी शासनाने हा उपक्रम राबविला आहे. याद्वारे शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्यास मदत होणार आहे. या संवाद सत्रातील विजेत्यांचा मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद होणार आहे. या प्लॉटफॉर्मचा योग्य उपयोग करा व जनतेत जागृती करुन विवेकशिल समाज घडवा, अशा शुभेच्छा प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांनी उपस्थितांना दिल्या.
सोशल मिडिया माहितीच्या आदानप्रदानाचे महत्वाचे माध्यम असून तरुण पिढीने सोशल मिडिया काळजीपूर्वक वापरण्याची आवश्यकता आहे. आपल्या हातून चुकीचा संदेश जाणार नाही. ही काळजी घेतल्यास सोशल मिडिया समाजोपयोगी माध्यम ठरेल. सोशल मिडिया महामित्र हा उपक्रम सकारात्मक संदेश देणारा असून सोशल मिडिया विषयी जागृती निर्माण करणारा असल्याचे तलमले यांनी सांगितले.
या सत्राकरीता जे. एम. पटेल महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख सुमंत देशपांडे, सामाजिक कार्यकर्ता नितीन कारेमोरे, अक्षय वानखेडे, परिविक्षाधिन तहसिलदार सिध्दार्थकुमार मोरे व रोहित भोंगाडे यांनी निरिक्षक व परिक्षक म्हणून काम पाहिले. संचालन व प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी केले तर आभार सतिश ठाकरे यांनी मानले.

Web Title: Positive use of social media needs time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.