बनावट फेसबुकवरून अश्लील कॉमेंट
By Admin | Updated: April 11, 2015 00:33 IST2015-04-11T00:33:30+5:302015-04-11T00:33:30+5:30
माझ्या पत्नीच्या नावाने बनावट फेसबुक तयार करून त्यावर अश्लील फोटो व कॉमेंट अपलोड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

बनावट फेसबुकवरून अश्लील कॉमेंट
पत्रपरिषद : धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार
भंडारा : माझ्या पत्नीच्या नावाने बनावट फेसबुक तयार करून त्यावर अश्लील फोटो व कॉमेंट अपलोड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असून याप्रकरणी पोलिसांना तक्रार देऊनही ते बनावट फेसबुक बंद करण्यात आले नसल्याचा आरोप आबिद सिद्धीकी यांनी आयोजित पत्रपरिषदेत केला.
यावेळी सिद्धीकी म्हणाले, माझ्या पत्नीच्या नावे बनावट फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आला आहे. या अकाऊंटमध्ये धार्मिक भावना भडकविणारे संदेश व फोटो आहेत. या संदेशाला दहशतवादी संघटनांना ‘लाईक’ करण्यात आले आहे. आरोपीचा उद्देश शहरात तणाव भडकविण्याचा आहे. त्याचा परिणाम आपल्या कुटुंबीयावर होण्याची शक्यता आहे.
बनावट सीमवरून धमकी
यावेळी सिद्धीकी म्हणाले, २०१४ मध्ये भारतीय दूरसंचार विभागातून सीमकार्ड घेण्यासाठी दिलेले आपले छायाचित्र व ओळखपत्र चोरी झाल्याची तक्रार २०१४ मध्ये केली होती. त्या मोबाईलनंबर वरून धमकीवजा देणारे संदेश पाठविण्यात आले होते. आता त्याच नावावर खाजगी कंपनीचा सीम घेण्यात आला होता. त्यावरुन धमकी देण्यात येत आहे.
याची भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार करुनही पोलिसांकडून अजूनपर्यंत आरोपींना शोधण्यात आले नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पत्रपरिषदेला भाजपचे शहर अध्यक्ष विकास मदनकर, शितल तिवारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)