लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदुर : देशात व राज्यात कोरोणाचे भयावह संकट आहे.हे संकट केव्हा दुर होणार हे खात्रीपूर्वन सांगता येत नाही. मात्र या संकटात विद्यवा, अपंग, गोर गरिब जनता गरजू लाभार्थी व सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबाची उपासमार होणार नाही, याची काळजी घ्या असे आदेश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिला. लाखांदूर तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत तालुका प्रशासन अधिकाऱ्यांशी संवाद साधत होते.लाकडाऊनमुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनता व शेतकरी शेतमजूराची कामे थांबली असल्याने सबंधीतावर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने मोफत अन्नधान्याचे वाटप चालविले आहे. या वाटप प्रक्रीयत सर्व सिधापत्रिकाधारक लाभार्थी विधवा ,अपंग व गरजू लाभार्थ्यांना सर्वेक्षण करून कोणीही अन्नधान्यापासून वंचित राहनार नाही याची काळजी घ्यावी तालुक्यातील ज्या गावात शासनाच्या विविध योजने अंतर्गत मजूरीची कामे मंजूर आहेत अशी कामे तात्काळ सूरू करण्यात यावे असे सांगितले.गावातील जि कुटुंबे गरजू कुटुंबे शिधापत्रिकाधारक नाहीत अशा कुटूंबाचे पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदी मार्फत सर्वेक्षण करून पुढील दोन दिवसात सबंधीताची यादी तालुका प्रशासनाकडे व शासनाकडे सादर करावी. या कामात कोणीही हयगय करणार नाही, याची दक्षता तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. लाकडाऊनमुळे ग्रामीण भागातील गरिब कुटुंबाची झालेली वाताहत व उपासमार राखण्यासाठी सर्वांनी र्नी तत्पर असले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.आढावा बैठकीत तालुक्यातील महसूल, पंचायत समिती, वनविभाग,पाटबंधारे, बांधकाम, पोलीस ठाणे,विज वितरण कंपनी आदी विभागाचे सर्वप्रमुख अधिकारी उपस्थित होते.यावेळी आमदार राजू कारेमोरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिलभाऊ फुंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे , माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, माजी खासदार मधुकर कुकडे, जिल्हा कांग्रेस अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, तालुका अध्यक्ष भुमेश्वर महावाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष राऊत, जिल्हा सदस्य शुद्धोमता नंदागवळी, बालु चुन्ने, अॅड. मोहन राऊत, उदय भैया, सरपंच उत्तम भागडकर, सुभाष खिलवानी, पंचायत समिती सभापती मंगला बगमारे, प्रमिला कुटे, मिलिंद डोंगरे यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गरीब व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:01 IST
लाकडाऊनमुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनता व शेतकरी शेतमजूराची कामे थांबली असल्याने सबंधीतावर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने मोफत अन्नधान्याचे वाटप चालविले आहे. या वाटप प्रक्रीयत सर्व सिधापत्रिकाधारक लाभार्थी विधवा ,अपंग व गरजू लाभार्थ्यांना सर्वेक्षण करून कोणीही अन्नधान्यापासून वंचित राहनार नाही याची काळजी घ्यावी तालुक्यातील ज्या गावात शासनाच्या विविध योजने अंतर्गत मजूरीची कामे मंजूर आहेत अशी कामे तात्काळ सूरू करण्यात यावे असे सांगितले.
गरीब व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहू नये
ठळक मुद्देपालकमंत्री : आढावा बैठक, मंजूर कामे तात्काळ सूरू करण्याचे आदेश