शहरं
Join us  
Trending Stories
1
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
2
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
3
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
4
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
5
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
6
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
7
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
8
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
9
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
10
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
11
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
12
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
13
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
14
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
15
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
16
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
17
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
18
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
19
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

तलावाचे डबके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 12:43 AM

एकेकाळी शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या तलावांची विद्यमानघडीला अत्यंत दूरवस्था झाली आहे. अतिक्रमणाचा विळखा व प्रशासनाची उदासीनता या दोन मुख्य बाबी विकासात अडसर ठरत आहे. अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाºया भंडारा शहरातील मिस्किन टँक बगीच्यामधील तलावाला अतिक्रमणामुळे डबक्याचे स्वरूप आले आहे.

ठळक मुद्देअतिक्रमणाचा फटका । भंडारा शहरातील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एकेकाळी शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या तलावांची विद्यमानघडीला अत्यंत दूरवस्था झाली आहे. अतिक्रमणाचा विळखा व प्रशासनाची उदासीनता या दोन मुख्य बाबी विकासात अडसर ठरत आहे. अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या भंडारा शहरातील मिस्किन टँक बगीच्यामधील तलावाला अतिक्रमणामुळे डबक्याचे स्वरूप आले आहे. याकडे पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.भंडारा शहरात बोटांवर मोजण्याइतकेच तलाव नामशेष आहेत. त्यातही त्यांची देखरेख व दुरूस्ती होत नसल्याने तलावाला भकास स्वरूप प्राप्त झाले आहेत. मिस्किन टँक तलाव, खांबतलाव, सागरतलाव, नवतलाव ही काही शहरातील तलावांची नावे असली तरी त्यांच्या देखभालीकडे प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष आहे. विशेषत: मिस्किन टँक तलावाला अतिक्रमणाचा विळखा लाभला आहे.एकेकाळी विस्तीर्ण क्षेत्रात असलेल्या या तलावाला आता अतिक्रमणामुळे डबक्याचे स्वरूप मिळाले आहे. त्यातही सण, उत्सवानंतर या तलावातील गाळ व अन्य साहित्य उपसले जात नसल्याने समस्येत अधिकच भर पडली आहे. ढिवरबांधवांना सदर तलाव लीजवर देण्यात येत असला तरी प्राप्त झालेल्या महसूलातून त्याची देखभाल मात्र होत नसल्याचे दृश्य आहे. तलावाच्या पाळीला लागूनच मोठ्या प्रमाणात गाळ, झाडीझुडपी व कचरा गोळा झाला आहे. या मिस्किन टँक बगीच्यात सकाळ-संध्याकाळी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. बगीच्याची अवस्था काही प्रमाणात चांगली असली तरी बालकांची मनोरंजनात्मक खेळणीही नादुरूस्त आहे.त्यातही तलावाकडे बघितल्यास बगीच्याच्या सौंदर्यात भर पडण्यापेक्षा नागरिक तिथून निघून जाण्यात धन्यता मानतात. अनेक संघटना व नागरिकांनी या तलावासह बगीच्याच्या सौंदर्यीकरणासाठी पालिकेकडे सांगितले. मात्र त्यावर अजुनपर्यंत मोठा निर्णय घेण्यात आलेला नाही.निधीचा वाणवा अपुर्ण मनुष्यबळ या कारणाने मिस्किन टँकचा उद्धार झालेला नाही. पालिका प्रशासनाने वार्षिक अर्थसंकल्पात तलावाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करून तलावाला गतवैभव प्राप्त करून देण्याची गरज आहे. सोबतच तलाव पाळीवर असलेले अतिक्रमण निर्मूलन करून विकासात्मक कार्यावर भर देणे महत्वाचे आहे. शहरातील अन्य तलावांच्या दुरूस्तीवरही भर द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण