शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
5
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
6
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
7
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
8
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
9
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
10
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
11
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
13
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
14
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
15
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
16
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
17
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
18
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
19
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
20
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

धान खरेदीचे धोरण विधिमंडळात ठरविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 06:00 IST

भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. परंतु धान खरेदीचे कोणतेही सुसुत्र धोरण नाही. साधारणत: नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात धान खरेदीला प्रारंभ होतो आणि त्याच वेळी नियोजन केले जाते. ऐनवेळेवर नियोजन होत असल्याने शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच मोठा आर्थिक फटकाही बसतो.

ठळक मुद्देनाना पटोले : हंगामाच्या सुरुवातीलाच खरेदीची पूर्वतयारी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आधारभूत खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना धान विकताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अवकाळी पावसात उघड्यावरील धान ओला होतो. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. हा प्रकार टाळण्यासाठी धान खरेदीचे धोरण विधिमंडळात ठरविणार असून हंगामाच्या सुरुवातीलाच धान खरेदीची पूर्व तयारी केली जाईल, असे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. परंतु धान खरेदीचे कोणतेही सुसुत्र धोरण नाही. साधारणत: नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात धान खरेदीला प्रारंभ होतो आणि त्याच वेळी नियोजन केले जाते. ऐनवेळेवर नियोजन होत असल्याने शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच मोठा आर्थिक फटकाही बसतो. हा प्रकार टाळण्यासाठी आपण धान खरेदीचे धोरण ठरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लवकरच विधीमंडळात यावर चर्चा करून शासननिर्णय घेतला जाईल, असे नाना पटोले यांनी सांगितले. धान खरेदीची पूर्व तयारी हंगामाच्या सुरुवातीला म्हणजे जून-जुलै महिन्यातच करण्याचा प्रस्ताव आहे. सप्टेंबरमध्ये धान निघतो. आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात धानाच्या खरेदीला प्रारंभ होतो. पूर्व तयारीत सुरुवातीला झाल्याने धानाची नासाडी होणार नाही. तसेच भरडाई आणि गोदामांचा प्रश्नही यातून सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्ह्यात गोदामांची संख्या वाढविण्यावरही यात भर दिला जाईल, असे नाना पटोले यांनी सांगितले.भंडारा शहराच्या बायपासचा प्रश्न मार्गी लावणारभंडारा शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गामुळे वाहतुकीची कोंडी आणि अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यावर पर्याय म्हणून मुजबी गावापासून कोरंभी देवी मार्गे बायपास काढण्याचा प्रस्ताव आहे. वैनगंगा नदीवर कोरंभीजवळ मोठा पूल उभारला जाईल. वाहतुकीची समस्या तर सुटेल परंतु गोसे प्रकल्पाचे विहंगम दृष्य अनुभवण्यासाठी पर्यटक आकर्षित होतील. बॅक वॉटरचा उपयोग पर्यटनासाठी करण्याचा प्रयत्नही होणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.धापेवाडा टप्पा तीन सुरु होणारभंडारा जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहेत. २०२२ पर्यंत गोसे प्रकल्प पूर्ण होईल. सर्व समस्या निकाली काढल्या जातील. सिंचनासाठी धापेवाडा टप्पा तीन लवकरच सुरु होणार असून दोन महिन्यात प्रस्ताव सादर करण्याचे आपण निर्देश दिल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले