पोलीस ठाणे रस्त्याची चाळण
By Admin | Updated: January 1, 2017 01:00 IST2017-01-01T01:00:33+5:302017-01-01T01:00:33+5:30
रस्ते गावाचा चेहरा दर्शवितात. रस्त्याचे जाळे गाव विकासाला चालना देते.

पोलीस ठाणे रस्त्याची चाळण
खड्डेच खड्डे : वाहतुकीला अडसर, लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष
पालांदूर : रस्ते गावाचा चेहरा दर्शवितात. रस्त्याचे जाळे गाव विकासाला चालना देते. विकासाला पुढे गती द्यायची झाल्यास रस्त्याची मजबुती अत्यंत गरजेची आहे. पालांदूर - मऱ्हेगाव रस्त्यावरील पोलीस ठाणे पर्यंतच्या रस्त्याची अक्षरश: खड्ड्यांनी चाळण झाली आहे. दुरुस्तीकरिता लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रशासन डोळेझाक करीत असल्याने जनतेचा रोष अनावर होत आहे.
याच मार्गावर जिल्हा परिषद महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे असून दिवसभर वाहतूक सुरुच असते. पावसाच्या दिवसात खड्डे पाण्याने भरलेले असतात. यामुळे विद्यार्थीवर्गांना अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. पोलीस ठाण्याच्या पुढे काही अंतरावर मऱ्हेगावकडे जाणाऱ्या रस्त्याची हीच दुरवस्था कायम आहे. मऱ्हेगाववासीयांनी आमदार, खासदार यांना कळवूनही आश्वासनापलिकडे काहीही मिळणे नसल्याची खंत मऱ्हेगाववासीयांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)