पोलीस पथक परतले रिकाम्या हाताने
By Admin | Updated: February 19, 2015 00:32 IST2015-02-19T00:32:44+5:302015-02-19T00:32:44+5:30
हरदोली (सिहोरा) येथील बेपत्ता युवकाच्या शोधात कोलकत्ता, बिलासपूर व रायगड येथे गेलेले पोलीस पथक रिकाम्या हाताने परत आले.

पोलीस पथक परतले रिकाम्या हाताने
तुमसर : हरदोली (सिहोरा) येथील बेपत्ता युवकाच्या शोधात कोलकत्ता, बिलासपूर व रायगड येथे गेलेले पोलीस पथक रिकाम्या हाताने परत आले. पुन्हा पोलीस पथक शोध मोहिमेवर जाणार आहे.
हरदोली (सि) येथील सदानंद नेवारे (२०) हा तरुण रोजगाराच्या शोधात बिलासपुरला गेला असता तिथून बेपत्ता झाला. ३१ जानेवारीला सदानंद आणि मोहगाव खदान येथील आशिष मेश्राम (३०) असे दोघेजण बिलासपूर (छत्तीसगड) शहरात रोजगारासाठी गेले होते. २ फेब्रुवारीला आशिष मेश्राम गावाकडे परतला. सदानंद गावाकडे परतला नाही. त्यामुळे त्याची आई वंदना नेवारे यांनी सिहोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात आशिषची कसून चौकशी पोलिसांनी केली. बिलासपूर रेल्वे स्थानकावरीेल सिसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सदानंद व आशिष दोघेही दिसले. परंतु ३ फेब्रुवारीपासून सदानंद गायब झाला.
सदानंदच्या शोधात सिहोरा पोलिसांनी रायगड, बिलासपूर व कोलकात्याला एक पथक पाठविले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक एन.आर. झायले, पोलीस शिपाई माणिक पटले, राम साठवणे, ईश्वर चौधरी, गिरीधरलाल बोकडे यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)