वृक्षांसह पोलिसांना राख्या बांधून रक्षाबंधन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:37 IST2021-08-23T04:37:21+5:302021-08-23T04:37:21+5:30

यानंतर परिसरातील वृक्षांना राखी बांधून वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड व निसर्गाच्या समतोलासाठी समाजातील प्रत्येक स्त्री-पुरुषांनी एक तरी झाड लावण्याचे ...

Police in riot gear stormed a rally on Friday, removing hundreds of protesters by truck | वृक्षांसह पोलिसांना राख्या बांधून रक्षाबंधन उत्साहात

वृक्षांसह पोलिसांना राख्या बांधून रक्षाबंधन उत्साहात

यानंतर परिसरातील वृक्षांना राखी बांधून वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड व निसर्गाच्या समतोलासाठी समाजातील प्रत्येक स्त्री-पुरुषांनी एक तरी झाड लावण्याचे आवाहन शिवाजी लेझीमच्या अध्यक्षा कल्याणी तिरपुडे (निखाडे) यांनी केले. यानंतर राखी पाैर्णिमेच्या सणाचे महत्त्व लक्षात घेत जवाहरनगर पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी बैसाने तसेच ठाण्यातील इतर पोलीस बांधवांना शिवाजी लेझीम ग्रुपच्या महिलांनी राखी बांधून समाजासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करीत असलेल्या पोलिसांचा सत्कार केला. मागील दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना काळात लोकांच्या रक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पोलिसांनी कर्तव्य निभावले आहे. यामुळे परिसरातील नागरिक सदैव ऋणी राहतील असे शिवाजी लेझीम ग्रुपच्या अध्यक्षा कल्याणी तिरपुडे (निखाडे) यांनी सांगितले. यावेळी जवाहरनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी बैसाने यांनी परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच सामाजिक कामांसाठी शिवाजी लेझीम ग्रुपच्या पदाधिकारी यांनी जवाहरनगर पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Web Title: Police in riot gear stormed a rally on Friday, removing hundreds of protesters by truck