पोलिसांनी वाढविली गस्त
By Admin | Updated: December 3, 2014 22:43 IST2014-12-03T22:43:25+5:302014-12-03T22:43:25+5:30
‘पालिकेच्या चाळीत ‘गांजा’चा अड्डा’ या आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. आज बुधवारला सकाळी ११ वाजता पोलीस निरिक्षक हेमंत चांदेवार हे ताफ्यासह या ठिकाणी

पोलिसांनी वाढविली गस्त
पालिका सरसावली : पोलिसांनाही आढळून आले आक्षेपार्ह साहित्य
भंडारा : ‘पालिकेच्या चाळीत ‘गांजा’चा अड्डा’ या आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. आज बुधवारला सकाळी ११ वाजता पोलीस निरिक्षक हेमंत चांदेवार हे ताफ्यासह या ठिकाणी भेट दिली असता त्यांना त्याठिकाणी गांजाची वास आणि गांजा पिण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. त्यानंतर त्यांनी या भागात गस्त वाढविली आहे.
पोलीस निरीक्षक चांदेवार हे त्याठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी परिसरातील नागरिकांशी चर्चा केली असता, या घटनेची सत्यता कळली. त्यानंतर पालिका मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करुन या परिसरात प्रवेशबंदी करा. चाळीची सरंक्षक भिंत उंच करा, दुकानाचे शटर बंद करण्यात यावे. पालिकेने एखादा कर्मचारी नेमावा, त्यांच्या सोबतीला पोलीस देऊ, असे सांगून त्याउपरही कुणी प्रवेश करीत असेल तर गुन्हे दाखल करण्यात येईल, असे सांगितले.
गांजा विक्रीची घटना उघडकीस आणून देणारे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर शहरातील अनेक गणमान्य नागरिकांनी फोन करुन ‘लोकमत’च्या धाडसाचे प्रशंसा केली. (लोकमत चमू)
चाळीच्यामागे एसडीपीओ कार्यालय
नगरपालिकेच्या ज्या चाळीमध्ये गांजा विक्री आणि गांजा पिण्याचे काम सुरू असते, ती चाळ उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयामागे आहे. मागील अनेक वर्षांपासून शहरात आणि उपविभागात येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार सुरू असतानाही उपविभागीय अधिकारी किंवा त्यांच्या पथकाकडून आतापर्यंत एकही कारवाई करण्यात आलेली नाही.
शहरात गांजा, चरस, अफूची विक्री होत नसल्याचे पोलिसांचे म्हणने आहे. ‘लोकमत’ने गांजा मिळवून त्याची छायाचित्रे प्रकाशित केली आहेत. त्यामुळे शहरात गांजा विक्री होत नाही, असे पोलीस प्रशासनाने आतातरी म्हणू नये, म्हणजे झालं.
शहराला लागून असलेल्या जवाहरनगर परिसरात मार्च महिन्यात चरस विक्रीची आणि लाखनी तालुक्यात गांजा विक्रीची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर विक्री सुरू असताना कुणावरही कारवाई झाली नाही. या नशेच्या आहारी गेलेले अनेक युवक तरुणपणातच वार्धक्याकडे गेलेले दिसून आले आहे.