पोलीस पाटलाची आत्महत्या
By Admin | Updated: June 26, 2017 00:22 IST2017-06-26T00:22:03+5:302017-06-26T00:22:03+5:30
सावरी (मुरमाडी) येथील पोलीस पाटील चंद्रशेखर शालिकराम चुऱ्हे (३८) यांनी २३ जून रोजी सकाळी किटकनाशक प्राशन केले.

पोलीस पाटलाची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : सावरी (मुरमाडी) येथील पोलीस पाटील चंद्रशेखर शालिकराम चुऱ्हे (३८) यांनी २३ जून रोजी सकाळी किटकनाशक प्राशन केले. रविवारला सकाळी उपचारादरम्यान त्यांचा भंडारा येथील खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. किटकनाशक प्राशनानंतर भंडारा येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे आईवडील, पत्नी, २ मुली असा आप्त परिवार आहे. चुऱ्हे यांची पाच वर्षापुर्वी सावरीचे पोलीस पाटील म्हणून निवड झाली होती.