शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

फिरते पोलीस ठाणे अभियान ठरले ‘रोल मॉडेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:58 IST

मागील तीन वर्षापासून भंडारा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस प्रशासनाने नवनवीन प्रयोग केले आहेत.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक विनिता साहू : सिटीझन कॉप ठरणार गुन्हेगारीसाठी कर्दनकाळ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागील तीन वर्षापासून भंडारा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस प्रशासनाने नवनवीन प्रयोग केले आहेत. गावातील वाद गावातच मिटावा, क्षुल्लकशा प्रकरणामुळे त्याचा फटका कुणालाही बसू नये. वेळ, श्रम आणि पैसाची बचत व्हावी यासाठी फिरते पोलीस ठाणे हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला जनतेचा भरभरून प्रतिसाद लाभत असून आता हा उपक्रम राज्यातील विविध पोलीस ठाण्यात अंमलात आणला असून फिरते पोलीस ठाणे हे ‘रोल मॉडेल’ ठरल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी सांगितले.फिरते पोलीस ठाण्याच्या यशस्वी प्रयोगानंतर त्या ‘लोकमत’शी बोलत होत्या. राज्यात आजपर्यंत कोणत्याही जिल्ह्यात फिरते पोलीस ठाणे ही संकल्पना नाही. गावात कुणाला तक्रार नोंदवायची असेल तर त्यांना पोलीस ठाण्यात जाण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु पोलीस अधीक्षक साहू यांनी पुढाकार घेत पोलीस ठाणेच जनतेपर्यंत नेण्याचा संकल्प करून हा उपक्रम सुरू केला.भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लहान मोठ्या गावात फिरते पोलीस ठाणे पथक जावून नागरिकांच्या तक्रारी स्वीकारतात.या तक्रारींचे निराकरण त्याच ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातो. आतापर्यंत शंभराच्यावर गावात हे फिरते पोलीस ठाणे पथक पोहोचले आणि नागरिकांच्या हजारो तक्रारींचे निराकरण करण्यात आले. हा उपक्रम आजही सुरूच आहे. दरम्यान, या उपक्रमाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा उपक्रम राज्यातील सर्वच जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी या नाविण्यपूर्ण उपक्रमाबद्दल त्यांनी पोलीस अधीक्षक विनिता साहू यांना गौरविले होते.अवैधधंदेमुक्तीसाठी धाडसत्रभंडारा जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री, घरफोडी, वाहनचोरीच्या अनेक घटना घडलेल्या असून २०१६ मध्ये खूनाच्या २३ घटना घडल्या होत्या त्यापैकी २० घटनांमधील आरोपींना अटक करण्यात आली.दरोड्याचे दोन आणि घरफोडीचे ३९, सोनसाखळी पळवून नेल्याच्या आठ घटना उघडकीस आणले आहेत. त्यापूर्वी आयपीलच्या धाडीत ३० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय जिल्ह्यात कुठेही अवैध व्यवसाय सुरू असल्यास त्याची माहिती देण्यासाठी कक्ष सुरू करण्यात आला असून नागरिकांनी निसंकोचपणे तक्रारी कराव्यात असे आवाहनही केले आहे.‘निर्भय बनो’ उपक्रमाला प्रतिसादशिक्षण घेण्याच्या वयात केवळ आमिषांचे प्रलोभन दाखवून त्यांना पळवून नेण्याचे प्रमाण अधिक आहे. यात समज नसलेल्या लहान मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत जिल्हा पोलीस प्रशासनाने भंडारा, तुमसर, साकोली आणि पवनी या चारही उपविभागातील शाळांमधील कार्यशाळा घेऊन विद्यार्थिनीमध्ये जनजागृती करण्यात आली. या कार्यशाळेत ज्या विद्यार्थिनीने सहभाग घेऊन हा विषय समजून घेतला त्यांना इतर विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या उपक्रमात जिल्ह्यातील दोन हजाराहून अधिक मुलींनी सहभाग घेतला. या उपक्रमासाठी यशदाचे प्रशिक्षक, डॉक्टर्स, स्त्रीरोग तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे, यासाठी सर्वांना आमंत्रित केल्याचे विनिता साहू यांनी ‘सांगितले.