तरूणाच्या शोधात पोलीस कोलकात्यात
By Admin | Updated: February 16, 2015 00:40 IST2015-02-16T00:40:25+5:302015-02-16T00:40:25+5:30
हरदोली शि. येथील सदानंद नेवारे (१९) हा तरूण रोजगाराच्या शोधात बिलासपुरला गेला असता तिथून बेपत्ता झाला आहे.

तरूणाच्या शोधात पोलीस कोलकात्यात
चुल्हाड/सिहोरा : हरदोली शि. येथील सदानंद नेवारे (१९) हा तरूण रोजगाराच्या शोधात बिलासपुरला गेला असता तिथून बेपत्ता झाला आहे. या तरूणाच्या शोधात सिहोरा पोलिसांच्या चार चमू गठित करण्यात आलेल्या असून एक चमू येथे गेली आहे.
हरदोली सि. गावात वास्तव्य असलेल्या वंदना नेवारे (६०) यांना तीन अपत्य आहेत. मंजुरी करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत आहे. सदानंद नेवारे हा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा आहे. ३१ जानेवारीला सदानंद आणि मेश्राम नामक तरूण असे दोघेजण बिलासपूर (छत्तीसगड) शहरात रोजगारासाठी गेले. परंतु २ फेब्रुवारीला मेश्राम नामक तरूण गावाकडे परतला आहे. सदानंद नेवारे गावाकडे परतला असल्याने आईने सिहोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी मित्राची चौकशी करण्यात आली. बिलासपुर रेल्वे स्थानकात असलेले सिसिटीव्ही फुटेडा तपासण्यात आलेले आहेत. यात सदानंद आणि मेश्राम हे दिसून आले आहेत. परंतु ३ फेब्रुवारीपासून सदानंद गायब झाला. या तरूणाच्या शोधात सिहोरा पोलिसांनी ४ चमू गठित केलेल्या आहेत. नागपूर, रायपूर, रायगड, बिलासपुर असा शहरात या चमु सदानंदचा शोध घेत आहेत. दरम्यान बिलासपूर येथून सदानंद कलकत्ताकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीत बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यामुळे पोलिसांची एक चमु कलकत्ता शहरात गेल्या तीन दिवसापासून सदानंदचा शोध घेत आहेत. सदानंद नेवारेच्या बेपत्ता झाल्याने गावात तर्क वितर्कांना उधाण आले आहे. (वार्ताहर)