पोलिसांचा तपास आता मुलीच्या मामाच्या दिशेने

By Admin | Updated: May 19, 2014 23:13 IST2014-05-19T23:13:27+5:302014-05-19T23:13:27+5:30

पिंडकेपार येथील अवैध गर्भपात प्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून यापैकी तिसरा आरोपी डॉ.बाला फरार आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत असून

Police investigating the girl's maternal uncle now | पोलिसांचा तपास आता मुलीच्या मामाच्या दिशेने

पोलिसांचा तपास आता मुलीच्या मामाच्या दिशेने

साकोली : पिंडकेपार येथील अवैध गर्भपात प्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून यापैकी तिसरा आरोपी डॉ.बाला फरार आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत असून आता पोलिसांची नजर मृतक मुलीच्या मामाकडे असल्याची माहिती मिळाली आहे तर दोन्ही आरोपींना पीसीआर मिळाला आहे.

मध्यप्रदेशातील अल्पवयीन मुलीला तिचा मामा रामु वाघाडे याने गर्भपात करण्यासाठी प्रथम डॉ.बाला याचेकडे नेले. यानंतर तिघेही साकोली येथे येवून पिंडकेपार येथे जातानी मामा वाघाडे हा साकोली येथेच थांबल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुलीच्या मृत्युनंतर डॉ.बाला व मुलीचा मामा पसार झाले.

त्यामुळे मामाकडे मुलगी आली कशी, त्यानंतर रात्रभर मामा साकोली येथे कुणाकडे थांबला, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलिसांची चौकशी आता मृतक मुलीच्या मामाकडून पूर्ण होईल. काल शवविच्छेदनानंतर मुलीचे आई-वडील व मामा मृतदेह घेवून गावी गेले व आज अंत्यसंस्कार झाल्यानंतर मामा याला आणण्यात येईल, अशी माहिती पोलीस सुत्राकडून मिळाली.

या प्रकरणी पोलिसांनी वसंत बाळबुद्धे रा.पिंडकेपार व बघेले या खैरलांजी या दोघांना काल सायंकाळी अटक केली व आज न्यायालयात हजर केले. यावर न्यायालयाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव व पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे करीत आहेत.

(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Police investigating the girl's maternal uncle now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.