पोलीस दलाची एकता दौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:20 IST2018-10-31T22:20:21+5:302018-10-31T22:20:46+5:30

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि शहीद पोलीस जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बुधवारी पहाटे आयोजित एकता व सद्भावना दौडमध्ये शेकडो भंडाराकर धावले. या स्पर्धेत विकेश शेंडे व प्रियंका हलमारे यांनी बाजी मारली.

Police force unity race | पोलीस दलाची एकता दौड

पोलीस दलाची एकता दौड

ठळक मुद्देशेकडो नागरिक धावले : विकेश शेंडे व प्रियंका हलमारेंनी मारली बाजी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि शहीद पोलीस जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बुधवारी पहाटे आयोजित एकता व सद्भावना दौडमध्ये शेकडो भंडाराकर धावले. या स्पर्धेत विकेश शेंडे व प्रियंका हलमारे यांनी बाजी मारली.
भंडारा येथील पोलीस कवायत मैदानातून या दौड स्पर्धेला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी शांतनू गोयल, सहदिवाणी न्यायाधीश भट्टाचार्य, पोलीस अधीक्षक विनिता साहू, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) बंडोपंत बन्सोडे यांच्या उपस्थितीत या दौडला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. त्रिमूर्ती चौक, बसस्थानक, गांधी चौक, शास्त्री चौक, शासकीय तंत्र निकेतन, गणेश नगर मार्गे ही दौड पोलीस कवायत मैदानात पोहचली.
या स्पर्धेत १८ वर्षावरील पुुरुष गटात १० कि.मी. मध्ये प्रथम विकेश शेंडे, द्वितीय लिलाराम बावणे, तृतीय अंकीत भडके तर १८ वर्षावरील महिला खुल्या गटात पाच कि.मी. मध्ये प्रथम प्रियंका हलमारे, द्वितीय नेहा गभणे, तृतीय ममता हलमारे यांनी पुरस्कार पटकाविले. सामान्य नागरिकांमध्ये प्रथम नरेंद्र लामकाने, द्वितीय देवराम बांते त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी गटात प्रथम पोलीस उपनिरीक्षक बी.डी. पंधरे, द्वितीय पोलीस हवालदार शंकर चौधरी, तृतीय पोलीस निरीक्षक मनोज शिडाम विजेते ठरले.
त्याचप्रमाणे १९ आॅक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. त्यात जकातदार कन्या विद्यालयाचा विद्यार्थी तुषार शामरावजी काळे, पूनम राजकुमार राघोर्ते, सेजल लिलाधर सिंगनजुडे, नूतन महाराष्ट्र विद्यालयाची विद्यार्थिनी दीक्षा सुनील फेंडर, भावेश लक्ष्मण हलमारे, तन्मय रमेश खोकले, लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे प्रकाश रमेश निकुडे, तृप्ती माधवराव रंगारी, भूषण रवी मस्के यांचा समावेश आहे.

Web Title: Police force unity race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.