साकोली शहरात पोलिसांचा फ्लैग रुटमार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:37 IST2021-04-09T04:37:05+5:302021-04-09T04:37:05+5:30
ही रुटमार्च पोलीस ठाणे - महामार्ग - एकोडी चौक - एसबीआय बँक चौक - नागझिरा रोड - बसस्थानक परिसर ...

साकोली शहरात पोलिसांचा फ्लैग रुटमार्च
ही रुटमार्च पोलीस ठाणे - महामार्ग - एकोडी चौक - एसबीआय बँक चौक - नागझिरा रोड - बसस्थानक परिसर - परत वनविभाग मार्ग - नगरपरिषद कार्यालय चौक - होमगार्ड परेड मार्ग - गणेश वार्ड - न्यायालय मार्ग - लाखांदूर रोड ते पोलीस ठाणे असा काढण्यात आला. कोरोना काळात शासकीय नियमांचे पालन करावे, अनावश्यक जमावगर्दी टाळावी, मास्कचा नियमित वापर करण्यासाठी संदेश देण्यात आला. या रुटमार्चचे नेतृत्व उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, तहसीलदार रमेश कुंभरे, पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर, लाखनीचे पोलीस निरीक्षक मनोज वाढीवे, पोलीस सहायक निरीक्षक तेजस सावंत, पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुळकर्णी, पोलीस उपनिरीक्षक कमलसिंह सूर्यवंशी यांसह नगरपरिषद कर्मचारी स्वप्निल हमाने, पत्रकार संघाचे आशिष चेडगे सहभागी झाले होते.