वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना अपयश

By Admin | Updated: April 25, 2015 00:44 IST2015-04-25T00:44:23+5:302015-04-25T00:44:23+5:30

अड्याळ पोलीस ठाण्यांतर्गत कोंढा परिसरात वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना अपयश येत आहे.

Police failure to stop growing criminal | वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना अपयश

वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना अपयश

गुन्ह्यात वाढ : अवैध वाहतूकही जोरात, उपाययोजनेची गरज
कोंढा-कोसरा : अड्याळ पोलीस ठाण्यांतर्गत कोंढा परिसरात वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना अपयश येत आहे. मागील तीन महिन्यात घरफोडीच्या गुन्हयात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
कोंढा येथे २० दिवसापूर्वी एकनाथ गऱ्हाने यांच्या घरी अज्ञात चोरांनी घराला कुलूप असल्याची संधीसाधून घरफोडी केली. त्यांनी १० तोळे चांदीचे दागिने व रोख सहा हजार रुपये लंपास केले. ही घटना घडल्यानंतर तीन दिवसांनी कोंढा येथे भरफोडी झाली. पती-पत्नी सकाळी शाळेत गेले असता घराला कुलूप लावल्याची संधीसाधून अज्ञात चोरांनी आलमारी फोडली व तेथील चिल्लर व रोख रक्कम घेऊन पसार झाले.
कोंढा येथे तीन महिण्यापुर्वी रात्रीला अज्ञात चोरांच्या टोळीने निशाद बारचे शटर उघडून तेथील कॉऊन्टर व दारुच्या बाटल्यांची नासधूस केली होती. तसेच मुख्य मार्गावरील हार्डवेअरचे दुकान फोडले. अशा घरफोडीच्या घटनांमध्ये मागील काही दिवसात वाढ झाली आहे. कोंढा येथील पोलीस चौकीत दिवसरात्र पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहणे आवश्यक आहे. हे असल्यास पोलिसांचा धाक राहील. पोलिस बळ अपुरे असले तरी उपलब्ध पोलीस बळाचा वापर योग्य पध्दतीने केल्यास अवैध व्यवसाय बंद करता येते. सध्या लग्नसराई असून अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. हे थांबविणे आवश्यक आहे. अन्यथा अपघाताच्या संख्येत वाढ होईल. तरी वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Police failure to stop growing criminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.