शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शिपाईच निघाला चोर; न्यायालयाच्या पोलीस गार्डरुममधून रिव्हॉल्व्हरसह ३५ काडतुसे केली गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2022 17:06 IST

सावकाराला धाक दाखविण्यासाठी केला प्रकार; भंडारा ठाण्यात गुन्हा

इंद्रपाल कटकवार

भंडारा : कर्जबाजारीपणातून सावकाराला धाक दाखवण्यासाठी चक्क न्यायालयाच्या पोलीस गार्ड रुममधून पोलीस शिपायाने रिव्हॉल्व्हरसह ३५ काडतुसे चोरल्याची घटना उघडकीला आली. या घटनेने खळबळ माजली असून पोलिसांनी जलदगतीने चक्र फिरवून याप्रकरणी रिव्हॉल्व्हर व काडतुसे चोरून नेलेल्या पोलीस शिपायाला अटक केली आहे. निलेश खडसे असे अटक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याच्या ताब्यातून रिव्हॉल्व्हर व ३५ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

माहितीनुसार, पोलीस मुख्यालयात राखीव पोलीस निरीक्षक चौधरी हे २९ ऑक्टोबरला नेहमीप्रमाणे रात्री दरम्यान शासकीय कार्यालयातील पोलीस गार्ड तपासणीवर होते. याचवेळी त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयातील पोलीस गार्ड रूममध्ये कर्तव्यावर असलेले सहायक फौजदार सुनील सयाम यांचा फोन आला. त्यांनी मुद्देमाल गार्डमधील एक रिव्हॉल्व्हर व नऊ एमएमचे ३५ काडतुसे नसल्याची माहिती दिली.

याबाबत पोलीस निरीक्षक चौधरी यांनी तत्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली व घटनास्थळी रवाना झाले. रात्रीलाच न्यायालयातील गार्ड कक्षाची तपासणी केली असता सहायक फौजदार सुनील सयाम यांच्या नावे ताब्यात मिळालेली एक ०.३८ ची एक रिव्हॉल्व्हर व सहायक फौजदार चोले यांच्या ताब्यातील ३५ काडतुसे चोरीला गेल्याची बाब उघडकीला आली. गार्डमधील उपस्थित अमलदारांना विचारपूस करण्यात आली. घटनेची खात्री झाल्याने राखीव पोलीस निरीक्षक चौधरी यांनी भंडारा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तपास पोलीस उपनिरीक्षक निखिल राहाटे यांच्याकडे देण्यात आले.

महिला पोलीस शिपायाचे बयान ठरले महत्वपूर्ण

घटनेबाबत पोलीस गार्ड कक्षामधील सर्व अमलदार यांना विचारपूस करण्यात आली. घटनेचा पंचनामा सुरू असताना कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस शिपाई चव्हाण यांनाही विचारपूस करण्यात आली. चव्हाण यांच्या बयानानुसार, २९ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजताच्या सुमारास पोलीस शिपाई खडसे यांची ड्युटी नसतानाही ते एक बॅग घेऊन न्यायालयातील गार्ड कक्षात आले होते. एकटेच  कक्षात पाच मिनिटे थांबून शस्त्रांची तपासणी केली व बॅगसह तिथून निघून गेल्याचे सांगितले. पोलीस शिपाई चव्हाण यांचे बयाण तपासाला गती देणारे ठरले.

बयाणावर सीसीटीव्ही फुटेजचा शिक्का

महिला पोलीस शिपाई चव्हाण यांच्या बयानानंतर जिल्हा न्यायालयात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. यात सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर गार्ड पहाऱ्यावरील अंमलदार पोलीस शिपाई निलेश खडसे हा आपल्यासोबत संशयास्पद एक बॅग घेऊन जाताना दिसून आले. तसेच त्याच्या एकंदरीत हालचालीवरून त्याच्यावर संशय बळवल्याने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस करण्यात आली.

सावकाराला होते धमकावायचे

पोलीस शिपाई निलेश खडसे याच्या कबुली जबाबानंतर सगळी घटना उघडकिला आली. कर्जबाजारीपणामुळे त्यांना पैशासाठी सततचा तगादा लावला जात होता. परिणामी सावकाराला धडा शिकवण्यासाठी आपण न्यायालयातील पोलीस गार्ड कक्षामधून रिव्हॉल्व्हर व ३५ काडतुसांची चोरी केल्याचे सांगितले. चोरी केलेले साहित्य सिव्हिल लाईन परिसरातील एका कक्षातून लपवून ठेवल्याचेही सांगितले. त्यानुसार रिव्हॉल्व्हर व ३५ काडतुसे जप्त करण्यात आली. न्यायालयाच्या पोलीस गार्ड कक्षातील रिवाल्वरसह ३५ काडतुसे चोरी केल्याप्रकरणी पोलीस शिपायाला अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

- लोहित मतानी, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकbhandara-acभंडारा