विनयभंग करणाऱ्याला पोलिसांचे अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 23:10 IST2018-06-01T23:10:21+5:302018-06-01T23:10:32+5:30
शेतशिवारात शेळ्या चराई कामानिमित्त गेलेल्या एका अल्पवयीन आदिवासी मुलीला अत्याचार करण्याच्या उद्देशाने ओढत नेवून विनयभंग केल्याची तक्रार सिहोरा पोलिसात करण्यात आली. आरोपीवर गुन्हाही दाखल झाला.

विनयभंग करणाऱ्याला पोलिसांचे अभय
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शेतशिवारात शेळ्या चराई कामानिमित्त गेलेल्या एका अल्पवयीन आदिवासी मुलीला अत्याचार करण्याच्या उद्देशाने ओढत नेवून विनयभंग केल्याची तक्रार सिहोरा पोलिसात करण्यात आली. आरोपीवर गुन्हाही दाखल झाला. परंतू आरोपीला अटक न करता चौकशीच्या नावाखाली आरोपीला पोलिस अभय देत आहेत, असा आरोप मुलीच्या पालकांसह आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रपरिषदेत केला.
तालुक्यातील हरदोली (सिहोरा) येथे २९ मे रोजी तेथील अल्पवयीन आदिवासी मुलगी ही घरच्या शेळ्या चराईकरिता घरामागे अर्धा कि.मी. अंतरावरील शेतशिवारात सकाळी ७ वाजता सुमारास गेली होती. दरम्यान अंदाजे ९ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी झाडाखाली बसली असता आरोपी हितेश देवू बिसने (१८) हा तिथे आला. तिच्यावर अत्याचार करण्याचा उद्देशाने तिचा हात पकडून तिला ओढत आडोशाला नेत असतांना आरोपीच्या तावडीतून सुटून मुलीने पळ काढला. घरी येवून पालकांना हकिकत सांगितली. यावरुन पालकाने सिहोरा पोलीस गाठून तक्रार नोंदविली.
त्यानुसार पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. पंरतु आजतागत आरोपीला साधी विचारपुसही करण्यात आली नाही. आरोपी मोकाटच फिरत असल्याने आदिवासी मुलगी व तिच्या कुटंूबाला धोका निर्माण झाला आहे. बोटावर मोजण्याइतके आदिवासी लोक गावात असल्याने त्यांच्यावर दबाव आणल्या जात आहे. परिणामी आदिवासी कुटूंब आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जात असतांना पोलिसांनी केवळ बघ्याची भुमिका घेतली आहे.
आदिवासींवर होणारे अन्याय कमी नाहीत. हा अन्याय सहन ेकेल्या जाणार नाही, असा दम आदिवासी संघटनेने दिला आहे. यावेळी संघटनेचे लक्ष्मीकांत सलामे, अशोक उईके डि. के. कुंभरे, नरेद्र मडावी, दिनेश मरस्कोल्हे, जयंत परतेती, विकास मरस्कोल्हे, शिवचरण वाढवे, आर. पी. मरस्कोल्हे उपस्थित होते.