पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात

By Admin | Updated: October 14, 2014 23:13 IST2014-10-14T23:13:41+5:302014-10-14T23:13:41+5:30

भंडारा, तुमसर व साकोली विधानसभा क्षेत्रासाठी उद्या मतदान होत आहे. निवडणुकीदरम्यान घातपात किंवा अनुचित घटनेची शक्यता लक्षात घेता, जिल्हा पोलीस प्रशासनाने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

Police deployed security arrangements | पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात

पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात

भंडारा : भंडारा, तुमसर व साकोली विधानसभा क्षेत्रासाठी उद्या मतदान होत आहे. निवडणुकीदरम्यान घातपात किंवा अनुचित घटनेची शक्यता लक्षात घेता, जिल्हा पोलीस प्रशासनाने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्ह्यात १७ मतदान केंद्र नक्षलप्रभावित क्षेत्रात येतात. ९ मतदान केंद्र संवेदनशील असल्यामुळे त्याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्याबळ अपुरी असल्याने बाहेरून पोलीस कुमक बोलविण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पोलिसांनी सीआरपीएफच्या १४७ व अन्य ६४ प्रकरणांची नोंद असलेल्या २११ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यातील २७२ व्यक्तींकडून प्रतिबंधात्मक कारवाईचे बाँड लिहून घेण्यात आले आहे.
भंडारा जिल्ह्यात १२ स्थिर सर्व्हेक्षण व भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. यात महसुल अधिकारी व कर्मचाऱ्यांसह ४८ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. भंडारा क्षेत्राची मतमोजणी पोलीस बहुउद्देशीय सभागृह, तुमसरची औद्यागिक प्रशिक्षण संस्था व साकोलीची तंत्रनिकेतन महाविद्यालयात होणार आहे. मतदानानंतर येथील स्ट्रांगरूममध्ये ठेवण्यात येणाऱ्या ईव्हीएम पेटीच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त राहणार आहे.
नक्षल प्रभावित क्षेत्र
जिल्ह्यातील १७ गावे नक्षलप्रभावीत क्षेत्रात येतात. त्यात आतेगाव, कुठेझरी, उमरझरी, उसगाव, सातवाडा, जाभळी खांबा, वडेगाव, सितेगाव टोला, सालई, गोंडउमरी, वांगी, विहिरगाव व पिंपळगाव यांचा समावेश आहे. तर निवडणूक निरीक्षकांनी जिल्ह्यातील ९ मतदान केंद्रांना संवेदनशील असल्याचे त्यांच्या अहवालात नमुद केले आहे. त्यात भंडारा विधानसभा क्षेत्रातील ८ व साकोलीतील एका केंद्राचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Police deployed security arrangements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.