रनिंग हातभट्ट्यासह दारू विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:38 IST2021-08-27T04:38:17+5:302021-08-27T04:38:17+5:30

वरठी स्मशानघाट व सोनुली परिसरातील नाल्याजवळ असलेल्या दारुभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्र्या. गांधी व नेहरू वाॅर्ड परिसरात अवैध दारू विक्री ...

Police crack down on liquor dealers with running kilns | रनिंग हातभट्ट्यासह दारू विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

रनिंग हातभट्ट्यासह दारू विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

वरठी स्मशानघाट व सोनुली परिसरातील नाल्याजवळ असलेल्या दारुभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्र्या. गांधी व नेहरू वाॅर्ड परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमांना ताब्यात घेण्यात आले. चारही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे जयवंत चव्हाण व वरठीचे ठाणेदार सुधाकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी, हवालदार मनोहर दुधकवरे, घनश्याम गोमासे, प्रतीक उके, नितीन भालाधरे, शेषराव राठोड, सहायक उपनिरीक्षक जितेंद्र लांजेवार, आशिष लांजेवार, पोलीस उपनिरीक्षक उईके, सहायक उपनिरीक्षक मडामे, नंदकिशोर मारबते व मालोदे यांनी केली.

बॉक्स

रेतीचे तीन ट्रक ओव्हरलोड ताब्यात

अवैध व्यवसाय व चोरटी रेती वाहतूक यावर अंकुश लावण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. सहायक पोलीस निरीक्षकांनी गस्ती दरम्यान ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या तीन ट्रक चालक व मालक यांच्यावर कारवाई केली. ट्रक एकलारी, नागपूर व गोंदिया येथील असून क्षमतेपेक्षा जास्त रेती वाहून नेत असल्याने सदर कारवाई करण्यात आली. तिन्ही ट्रक पोलीस ठाण्यात जमा केले असून पुढील कारवाई करीत जिल्हा वाहतूक शाखेकडे सोपविण्यात आले आहे.

260821\img-20210826-wa0070.jpg

हातभट्टी नष्ठ करताना पोलीस पथक

Web Title: Police crack down on liquor dealers with running kilns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.