जनावरांची वाहतूक करताना पोलिसांनी ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:28 IST2017-10-14T23:27:47+5:302017-10-14T23:28:08+5:30
जनावरांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणाºया ट्रक चालकाला वरठी पोलिसांनी पहाटे दाभा फाट्याजवळ पकडले.

जनावरांची वाहतूक करताना पोलिसांनी ट्रक पकडला
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : जनावरांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणाºया ट्रक चालकाला वरठी पोलिसांनी पहाटे दाभा फाट्याजवळ पकडले. गोंदिया येथून नागपूर ला जाणाºया ट्रक मध्ये २४ बैल कोंबून भरले होते. पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सागर कारंडे यांनी ही कारवाई केली असून ट्रक चालक राहुल धमगये यांच्यावर प्राणी वाहतूक कायदाप्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
भंडारा-वरठी मार्गावरील दाभा फाट्यावर रात्रपाळीच्या गस्तीवर असलेले पोलीस हवालदार लक्ष्मीकांत कुकडे याना पहाटे भंडारा मागार्ने जाणाºया वाहनांची तपासणी दरम्यान एमएच ३५ के ५१२३ क्रमांकाच्या वाहनचालकाच्या हालचाली संशयित दिसल्या. त्यांनी वाहन बाजूला थांबवून तपासणी केले असता त्यात २४ बैल निर्दयीपणे कोंबून भरले असल्याचे दिसले. त्यावरून त्यांनी वरिष्ठांना सूचना देऊन तात्काळ कारवाई केली. वाहन चालक व वाहनाला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गाठले. तपासाअंती जनावराची वाहतूक हि अवैद्य असल्याचे आढळले. त्यानुसार वाहन चालकाला ताब्यात घेऊन सर्व जनावरांना गोशाळेत रवानगी करण्यात आली. यावेळी पोलीस हवालदार आकांत रायपूरकर, प्रदीप कुंभरे व राजेश वैद्य उपस्थित होते.