पोकलँडने नदीपात्रातील रेतीचा उपसा

By Admin | Updated: March 29, 2015 00:56 IST2015-03-29T00:56:52+5:302015-03-29T00:56:52+5:30

नदी पात्रात केवळ अर्धा मीटर रेती शिल्लक असताना नियमबाह्य सर्रास मशीनद्वारे पोकलँड रेती उत्खनन सर्रास तुमसर तालुक्याती नदी घाटावर सुरू आहे.

Pokeland pond steeple | पोकलँडने नदीपात्रातील रेतीचा उपसा

पोकलँडने नदीपात्रातील रेतीचा उपसा

लोकमत विशेष
मोहन भोयर तुमसर
नदी पात्रात केवळ अर्धा मीटर रेती शिल्लक असताना नियमबाह्य सर्रास मशीनद्वारे पोकलँड रेती उत्खनन सर्रास तुमसर तालुक्याती नदी घाटावर सुरू आहे. जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांचे येथे अभय असल्याचे समजते. महसूल प्रशासनात कारवाईचे अधिकार असल्याने ते कारवाई करू शकतात, असा सल्ला जिल्हा खनिकर्म अधिकारी देत आहेत. भूजल तथा पर्यावरण विभागाच्या आदेशाला येथे मूठमाती दिली जात आहे. पर्यावरणाला या प्रकारामुळे धोका निर्माण झाला आहे. खनिकर्म अधिकाऱ्यांनी रेती घाटांचे नाव सांगा असे आवाहन केले.
तुमसर तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. तालुक्यातील महाराष्ट्र शासनाने आठ रेती घाटांचा लिलाव या हंगामात केला. भंडारा जिल्ह्यात एकूण ३० रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला. सर्वात जास्त रेतीघाट (आठ) जिल्ह्यात तुमसर तालुक्यात आहेत. तुमसर तालुक्यातील आठ रेतीघाटातून शासनाला ४ कोटी ३ लाख ९ हजार ६१ हजारांचा महसूल प्राप्त झाला आहे.
सुकळी देव्हाडी ६९ लक्ष ६९ हजार, चारगाव दे. ६७ लक्ष ५५ हजार, बाम्हणी तुमसर ८५ लक्ष ५० हजार, देवनारा ११ लक्ष ७२ हजार, तामसवाडी सी. ८५ लक्ष, लोभी २० लक्ष ६० हजार, वारपिंडकेपार २८ लक्ष, आस्टी ३५ लक्ष असे महसूल प्राप्त झाले.
तालुक्यातील सुमारे चार रेती घाटात अर्धा मीटर रेतीचा साठा नदीपात्रात आहे. या रेतीघाटातून मशीनद्वारे रेतीचे सर्रास उत्खनन सुरू आहे. भूजल विभागाने रेती उत्खननाची नियमावली तयार केली. यात ज्या रेतीघाटावर अर्ध्या मीटर तथा त्यापेक्षा कमी रेती आहे. त्या घाटातून मशीनने पोकलँड तथा जेसीबी रेती उत्खनन करू नये असे कडक आदेश दिले आहेत. नियमबाह्य रेती काढल्यास त्यावर कडक कारवाई करण्याचा नियम आहे. तसे आदेश राज्य शासनाने संबंधित जिल्ह्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी व महसूल प्रशासनाला दिले आहे. अर्ध्या मीटर तथा त्यापेक्षा कमी रेती नदीपात्रात असेल तर जेथून मजूरांकडूनच रेती मॅन्युअल काढता येते, असे नमूद आहे. या रेतीघाटांचा लिलावसुद्धा अल्प किमतीत राज्य शासन करते हे विशेष. तुमसर तालुक्यात शासनाने आठ रेतीघाटांचा लिलाव यावर्षी केला. त्यापैकी चार रेतीघाटात केवळ अर्धा मीटर किंवा त्यापेक्षा कमी रेतीसाठा उपलब्ध आहे. शासनाने या रेतीघाटांचा लिलाव करायला नको पाहिजे होते. तो कां केला हा संशोधनाचा विषय आहे. मानवी हातांनी रेती उत्खनन करणे सहज शक्य नाही. जिल्ह्यात पवनी तालुक्यात ५ रेतीघाट किंमत ५ कोटी ४१ लाख ६९ हजार, मोहाडी ६ (३ कोटी ८२ लाख), साकोली ४ (३१ लाख ९५ हजार), लाखनी ४ (४७ लाख ३६ हजार), लाखांदूर २ (१ कोटी २७ लाख), भंडारा १ टाकळी (१ कोटी ५९ लाख). भंडारा जिल्ह्यातून शासनाला एकूण १६ कोटी ९२ लाख ६१ हजार ५५८ रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. रेती उत्खनन सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंतच करता येते.

Web Title: Pokeland pond steeple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.