भाषा समृद्धीसाठी कवी कट्टा
By Admin | Updated: August 27, 2014 23:19 IST2014-08-27T23:19:02+5:302014-08-27T23:19:02+5:30
आसगाव जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात दैनिक परिपाठ विभागाच्या वतीने कवी कट्टा हा उपक्रम सुरु करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या मनातल्या भावना कागदावरच उतरवाव्यात.

भाषा समृद्धीसाठी कवी कट्टा
आसगाव : आसगाव जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात दैनिक परिपाठ विभागाच्या वतीने कवी कट्टा हा उपक्रम सुरु करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या मनातल्या भावना कागदावरच उतरवाव्यात. त्या भावना कविता रुपाने सादर करण्यासाठी मंचाचा सराव व्हावा, मंचावर कविता सादरीकरणातून आत्मविश्वास समवावा या उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
दर शनिवारी अनेक विद्यार्थी कविता सादरीकरणासाठी पुढे येत आहेत. अनेक कविता मुलं स्वत: तयार करतात व निर्भयपणे त्या सादर पण करतात. यातील काही विद्यार्थ्यांच्या कवितांचे कळ्यांच्या पाऊलखुणा हे हस्तलिखीत तयार झाले. विद्यार्थ्यांच्या या कलागुणांचे कौतूक रमेश पारधी यांनी केले. स्मिता गालफाडे, एम.टी. धानगाये, कावडे, सी.एल. गडपायले, जी.बी. पाथोडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. प्राचार्य बी.बी. बावणे, नरेश मोटघरे, एन.एल. बगमारे यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले. (वार्ताहर)