भरतीच्या नावावर तरुण बेरोजगारांची लूट
By Admin | Updated: May 23, 2017 00:21 IST2017-05-23T00:21:42+5:302017-05-23T00:21:42+5:30
भारत ति सीमा पोलीस बलाच्या आयटीबीपी सरळ सेवा भरतीच्या नावावर तालुक्यातील शेकडो बेरजगार युवकांना कोणतीही लेखी फिजीकल न घेता ....

भरतीच्या नावावर तरुण बेरोजगारांची लूट
विद्यार्थ्यांना पाठविले खोटे नियुक्तीपत्र : १८७५० रुपये बँक खात्यात जमा करण्याचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : भारत ति सीमा पोलीस बलाच्या आयटीबीपी सरळ सेवा भरतीच्या नावावर तालुक्यातील शेकडो बेरजगार युवकांना कोणतीही लेखी फिजीकल न घेता खोेटे नियुक्ती पत्र पाठवून बेरोजगार तरुणांची लुट करण्याचा प्रकार तुमसर तालुक्यात उघडकीस आला आहे.
आयटीबीपी भारत तिब्बत सीमा पोलीस बलाची भरतीही सन २०१५ ला निघाली असता तालुक्यातील अनेक बेरोजगार युवकांनी सरळ सेवेकरिता आवेदन केले होते. परंतु फिजीकल टेस्ट मध्ये अनफिट झाल्याने अनेक बेरोजगारांना माघारी परतावे लागले होते. परंतु आता दीड ते दोन वर्षानंतर त्याच अनफिट झालेल्या युवकांना त्यांच्या घरच्या पत्यावर भारत तिब्बत सीमा पोलीस बलाचे खोटे नियुक्ती पत्र पाठविण्यात आले आहे. त्या नियुक्तीपत्रात लेखी स्वरुपात लिहिले आहे की, भारत सरकारने तुमची आयटीबीपी करिता निवड करण्यात आलेली आहे. ५२०० प्रमाणे ग्रेड पे वेतन दिल्या जाणार आहे. सदर नियुक्तीपत्र मिळताच नियुक्ती पत्रात दिलेल्या बँक खात्यामध्ये ४८ तासाच्या आत १८,७५० रुपये जमा करून पैसे जमा केल्याची खातरजमा केल्याशिवाय जॉईनिंगचे ठिकाण सांगणार नाही असे स्पष्ट उल्लेख नियुक्तीपत्रात असल्याने बेरोजगारांनी खात्यात पैसे टाकले. त्यानंतर त्या क्रमांकावर संपर्क होत नसल्यामुळे गंडविल्या गेल्याची प्रचिती आली. विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वी भरलेल्या सरळ सेवा भरतीचे आवेदनात विद्यार्थ्यांनी संपूर्ण माहिती भरली होती. त्या पत्यावरच आयटीबीपी मार्फत पत्रव्यवहार होत असून बेरोजगारांना गंडविण्याच्या व्यवहारात आयटीबीपीचे मोठे अधिकारी तसेच कर्मचारी सहभागी नाहीत ना अशी शंका बळावली असून सदर प्रकरणाची चौकशीची मागणी बेरोजगार युवकांनी केली आहे.