बैलगाड्यांच्या शर्यतीला मंजुरीमुळे पटशौकिनात आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 23:57 IST2017-08-01T23:55:42+5:302017-08-01T23:57:36+5:30
महाराष्ट्रात पुन्हा बैलगाड्याच्या शर्यती सुरू करण्यासाठी अडथडे आता दूर झाले आहेत.

बैलगाड्यांच्या शर्यतीला मंजुरीमुळे पटशौकिनात आनंद
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : महाराष्ट्रात पुन्हा बैलगाड्याच्या शर्यती सुरू करण्यासाठी अडथडे आता दूर झाले आहेत. महाराष्ट्र विधानसभेने मंजुर केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतीची स्वाक्षरी होऊन आता कायद्यात रूपांतर झाल्याने पटशौकीनात कमालीचा आनंद संचारला आहे. त्यामुळे यावर्षी पासून पटाच्या दानीवर पुन्हा दुर्र दुर्रचा आवाज ऐकू येणार आहे.
महाराष्ट्रात शेतकºयांचा मनोरंजनाचा खेळ म्हणून पटाला मान्यता होती. दिवाळीत शेतीचे कामे संपवून शेतकरी मनोरंजन म्हणून बैलाच्या पटात सहभागी होत होते. यात मुला-मुलीचे विवाह जोडणे, पटानिमित्त नातेवाईकांच्या गावी जाणे यासारखे प्रकार होत होते. एवढेच नाही तर दोन दिवसीय पटानिमित्त ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत होत्या. मात्र या बैलाच्या शर्यतीमध्ये बैलांना अमानुष मारहान केली जाते. त्यांना ईजा पोचविली जाते, जुगार खेळला जातो अशा अनेक विघ्न करतानी २०११ पासून शासनाने पटावर बंदी आणली तेव्हापासून पट बंद झाले.
यानंतर हे शंकरपट पुन्हा नव्याने सुरू करण्यात यावे यासाठी महाराष्ट्रातील अनेक पटशौकीनांनी न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली. यात साकोली येथून प्रभाकर सपाटे, पटशौकीन जगत रहांगडाले यांनीही याचिका दाखल केली होती. तामिळनाडूमध्ये बैलाचा खेळ आणि महाराष्ट्रातील बैलगाड्याच्या शर्यती या पारंपारिक खेळ आहे, असे याचिकाकर्त्यांनी सांगितले.
न्यायालयाच्या बंदीनंतर या खेळाला परवानगी देण्यासाठी तामिळनाडू विधानसभेणे विधेयक मंजुर केला. त्याच आधारावर महाराष्ट्र विधानसभेने बैलगाडी शैर्यती विधेयक संमत केले. आता या विधेयकावर राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाली असून यावर्षीपासून शंकरपटाला सुरुवात होणार आहे.