शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा
By Admin | Updated: August 5, 2015 00:50 IST2015-08-05T00:50:30+5:302015-08-05T00:50:30+5:30
भंडारा धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. जुलै महिना संपूनही पावसाची सरासरी निम्म्याहून कमी असल्याने खरीप पीक धोक्यात आले.

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा
राष्ट्रवादीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन : पावसाअभावी शेतकरी हवालदिल, रोवणीयोग्य पावसाची प्रतीक्षा
लाखांदूर / साकोली : भंडारा धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. जुलै महिना संपूनही पावसाची सरासरी निम्म्याहून कमी असल्याने खरीप पीक धोक्यात आले. त्यामुळे लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून आर्थिक सहाय्यक करण्याच्या मागणीला घेवून तालुका राकाँचे पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.
आॅगस्ट महिन्याला सुरुवात झाली असताना मागील वर्षीच्या पावसाच्या सरासरीच्या तुलनेत यंदा पावसाची सरासरी अर्ध्यावर आहे. रोवणी थांबली. शेतकऱ्यांचे रब्बी धानपिकाचे धानाचे चुकारे अडले. यामुळे शेतकऱ्यांनी खासगी सावकाराच्या दारी जावून अव्वाच्या सव्वा टक्के व्याजदराने कर्ज काढून खरीप पिकाची लागवड केल्या. आता पावसाअभावी धानपिक धोक्यात आली. धानपिकाची वेळ निघून गेली आणि शेतकरी पुरता अडकला. तेव्हा संपूर्ण लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त करून शेतकऱ्यांनी कर्जमुक्त करून आर्थिक सहाय्य करण्याच्या मागणीला घेऊन तहसीलदार विजय पवार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. यावेळी तालुका राकाँ अध्यक्ष नरेश चुन्ने, पवन झोडे, देवीदास राऊत, अविनाश ब्राम्हणकर, दिपक चिमणकर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
साकोली येथेही निवेदन
साकोली : साकोलीत तहसीलदारांना निवेदन देतेवेळी तालुका अध्यक्ष अंगराज समरीत, उमेद गोडसे, प्रभाकर सपाटे, मदन रामटेके, डॉ.अनिल शेंडे, हेमंत भारद्वाज, लता दुरुगकर, सचिन शहारे, शारदा वाडीभस्मे, विष्णू कापगते, राजू देशमुख, मोहन बोरकर, भूषण लिचडे, महेश दडेमल, नरेश भुरे, लिनप्रकाश राऊत, अनिरुद्ध राऊत, गंगाधर सहारे, मुकेश जगीया, नरेश बावणे, देवेंद्र रोकडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)