सुविधांयुक्त क्रीडा संकुलाचा लाभ खेळाडूंनी घ्यावा संकुलाचे आधुनिकीकरण : माधवी खोडे यांचे प्रतिपादन

By Admin | Updated: March 28, 2015 00:31 IST2015-03-28T00:31:22+5:302015-03-28T00:31:22+5:30

जिल्हा क्रीडा संकुलामधील बॅडमिंटन हॉल, स्विमींग पुल नुतनीकरण, स्केटींग ग्राऊंड या खेळाचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे.

Players should take advantage of facilities sports complex, modernization of package: Madhavi Khode's rendering | सुविधांयुक्त क्रीडा संकुलाचा लाभ खेळाडूंनी घ्यावा संकुलाचे आधुनिकीकरण : माधवी खोडे यांचे प्रतिपादन

सुविधांयुक्त क्रीडा संकुलाचा लाभ खेळाडूंनी घ्यावा संकुलाचे आधुनिकीकरण : माधवी खोडे यांचे प्रतिपादन

 भंडारा : जिल्हा क्रीडा संकुलामधील बॅडमिंटन हॉल, स्विमींग पुल नुतनीकरण, स्केटींग ग्राऊंड या खेळाचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. सुविधांनी युक्त क्रीडा संकुलाचा लाभ खेळाडू व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी केले.
जिल्हा क्रीडा संकुलातील अद्यावत सुविधांचे लोकार्पण जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झाला. जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांनी प्रास्ताविकात राज्याच्या क्रीडा धोरणाविषयी माहिती सांगितली. यावेळी जिल्हा क्रीडा संकुलाचे वास्तुविशारद सुधीर श्रीवास्तव यांचा सत्कार करण्यात आला.संचालन क्रीडा अधिकारी अनिराम मरसकोले यांनी केले. तर आभार दिलीप इटनकर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रिडा अधिकारी त्रिवेणी बांते, मनोज पंधराम, क्रीडा मार्गदर्शक योगेश खोब्रागडे, नाजुक उईके, मिनल थोरात, विलास बनकर, गजेंद्र कारेमोरे, सुषमा नेरकर, रत्नमाला गायधने यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील खेळाडू व क्रिडाप्रेमी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Players should take advantage of facilities sports complex, modernization of package: Madhavi Khode's rendering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.