प्लास्टीकच्या पिशव्या पर्यावरणास घातक
By Admin | Updated: September 6, 2014 23:33 IST2014-09-06T23:33:55+5:302014-09-06T23:33:55+5:30
दरवर्षी होणारी अवैध वृक्षतोड आणि दिवसेंदिवस प्लास्टीकच्या वाढणाऱ्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याच्या सूचना जागतिक स्तरावरील तज्ज्ञांकडून वेळोवेळी व्यक्त करण्यात येत आहे.

प्लास्टीकच्या पिशव्या पर्यावरणास घातक
पहेला : दरवर्षी होणारी अवैध वृक्षतोड आणि दिवसेंदिवस प्लास्टीकच्या वाढणाऱ्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याच्या सूचना जागतिक स्तरावरील तज्ज्ञांकडून वेळोवेळी व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र प्लास्टीक पिशव्यांवर बंदी घालून पर्यावणाचा समतोल राखणे शक्य होणार नाही. यावेळी अस्तित्वात असलेल्या खाद्य पदार्थाची पॅकींग विशिष्ट व सर्व वातावरण सहन करणाऱ्या सिलबंद प्लास्टीक पिशव्यात केली जाते. या खाद्य पदार्थांची विक्री सर्वत्र जोमात होवून या पिशव् या प्रत्येक ठिकाणी साचतात. गावच्या परिसरात मोठ्याने अस्तव्यस्त पसरल्याचे त्या दिसतात. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्लास्टीक वस्तूंचा उपयोग हल्लीच्या काळात मोठ्या जोमाने फोफावला आहे. कोणत्याही ठिकाणी कोणताही समारंभ असो किंवा लग्न सोहळा असो यात मोठ्या प्रमाणात प्लास्टीक वस्तूंची उधळपट्टी करण्यात येते. अल्प काळासाठी उपयोग करून कुठेही मोकळी जागा दिसली की त्या ठिकाणी या वस्तू फेकून मोकळे होत असतात. शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्यांवर बंदी घातली. मात्र बहुतांश व्यवसायीक जाडीदार ठिसूळ प्लास्टीक पिशव्यांचा वापर करतात. त्या अल्प काळातच जमिनीत मुरुन नाहीशा होत आहेत.
मात्र खाद्य पदार्थांच्या पॅकींगमध्ये येत असलेल्या प्लास्टीक पिशव्या मजबूत, टिकावू व दर्जेदार असल्यामुळे त्या बऱ्याच काळापर्यंत टिकून राहतात. एकदा या पिशवीत खाद्यपदार्थ भरून पॅकींग झाल्यावर या पॉकीटमधून थोडीसुद्धा हवा बाहेर निघत नाही.
या खाद्यपदार्थांच्या पाकीटमधून खाद्यपदार्थ खावून उरलेल्या प्लास्टीक पिशव्या चालता फिरता कुठेही फेकल्या जातात. त्यामुळे पाळीव आणि मोकाट जनावरे त्या पिशव्या खावून मोठ्या संख्येने मृत पावल्या आहेत. तर काही प्लास्टीक पिशव्या सांडपाणी वाहणाऱ्या नालीत साचून अडकून राहिल्याचे दिसून येतात. त्यामुळे सांडपाण्याचा निचराही होत नाही.
शासनाने प्लास्टीक पिशव्यांवर बंदी घातली आहे. परंतु खाद्यपदार्थांच्या हवाबंद प्लास्टीक पिशव्यांना यातून वगळण्याचे काय कारण असावे हे संबंधीत प्रशासनालाच माहीत. या खाद्य पदार्थांच्या पिशव्या जागोजागी पसरत असल्यामुळे गावचा चेहरामोहराच बदलत आहे. (वार्ताहर)