शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

योजना जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजे

By admin | Updated: February 18, 2017 00:28 IST

केंद्र शासनाच्या अनेक योजना आल्या असून या योजना सर्व जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजे. याकरिता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

नाना पटोले : शासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभपवनी : केंद्र शासनाच्या अनेक योजना आल्या असून या योजना सर्व जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजे. याकरिता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. तहसील पातळीवर तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविल्या जावेत तसेच योजना जनतेच्या दारी पोहचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. गुरूवारी पवनी येथे झालेल्या जनता दरबारात ते बोलत होते.पटोले म्हणाले, या योजनाचा लाभ सर्व गोरगरीब जनतेला व गरजूंना झालाच पाहिजे. याकरिता सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे. त्याच्याकडे दिलेली जबाबदारी अथवा शासकीय व जनतेची कामे करण्यास कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केल्यास त्यांना देखील माफ केले जाणार नाही आणि त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल असा गंभीर इशारा त्यांनी दिला.केंद्र शासनाच्या अथवा राज्य शासनाच्या योजना या प्रत्येक घरापर्यंत पोहचल्याच पाहिजे. लोकांचे जीवनमान उंचावले पाहिजे. कर्मचाऱ्यांनी सकारात्मक भूमिका ठेवून काम केले पाहिजे. शासनाच्या योजना आपल्या दारी आल्या आहेत. या योजना धावल्या पाहिजेत तरच आपला विकास होईल. सात दिवसाच्या आत सर्व प्रकरणाचा निपटारा कर्मचाऱ्यांनी करावा अन्यथा त्यांना कार्यवाहीस पुढे जावे लागेल. यानंतर लोकांना सतरावेळा हेलपट्या खावे लागणार नाही, असेही त्यांनी बजावून सांगितले. प्रास्ताविक तहसिलदार वासनिक यांन केले. जनता दरबारात १५० चे वर प्रकरणे वा तक्रारी जनतेकडून आल्यात यात सर्वात अधिक प्रकरणे महसूल विभागाशी व गोसे धरणाशी संबंधीत आहेत. गोसे धरणामुळे निर्माण झालेल्या समस्या, पुर्नवसन, जमिनीचा मोबदला, फेरफार तसेच जमिनीचा सातबारा संबंधी व घरकुलासंबंधीच्या सर्व समस्यांचे निवारण खासदार नाना पटोले यांनी केले. दुपारी १.३० वाजता सुरू झालेला जनता दरबार सायंकाळी ६.३० वाजता समाप्त झाला. एकूण १५ शासकीय विभागाचा यात सहभाग होता. सर्व प्रमुख विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नाची उत्तरे दिलीत व ते सोडविण्याचे आश्वासन देखील दिलीत. यावेळी मंचावर आमदार अ‍ॅड. अवसरे पवनीच्या नगराध्यक्षा पुनम काटेखाये, भाजपा तालुका अध्यक्ष के.डी. मोटघरे, संदीप शेटीवार, ठाणेदार मधुकर गिते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पी.पी. गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन नायब तहसिलदार शुशांक कांबळे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)