लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या मृत्युपेक्षा अयोग्य नियोजनामुळे मरणाºया व्यक्तींची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता पासून सर्व विभागाने योग्य नियोजन केल्यास होणारी आपत्ती टाळता येईल. जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांत पाणी शिरुन मनुष्यहानी, पशुहानी तसेच वित्तहानी, शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्ता नाकारता येत नाही. अचानक उदभवणाºया परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी प्रतयेक विभागाने सतर्क रहावे. सोबतच प्रत्येक विभागाने आपली एसओपी तयार करुन १५ दिवसात सादर करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिल्या.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सुन पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अधिक्षक अभियंता महावितरण सुरेश मडावी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत झाडे, खंड विकास अधिकारी सपाटे, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास उपस्थित होते.निवासी उपजिल्हाधिकारी म्हणाले, वन विभागाने तेंदुपत्ता संकलन संस्थांना जंगलात आगी लावू नये असे निर्देश देण्यात यावेत. तसेच कोणीही जंगलात आग लावू नये त्यामुळे वन व वन्यजीव हानी पोहचून नैसर्गिक संपत्तीची हानी होते. आपापल्या विभागाचे आराखडे तात्काळ तयार करुन यादीसह आपत्ती व्यवस्थापन शाखेस सादर करावे. या कामास प्राधान्य द्यावे, हयगय करु नये. सर्व गावात मान्सून पूर्व जागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असून मुलभूत बचाव कार्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण लवकर आयोजित करण्याच्या सूचना भाकरे यांनी दिल्या.पुरग्रस्त १०२ गावांतील आपत्ती व्यवस्थापन सर्व विभागांनी करावे. जिल्ह्यातील सर्व सामाजिक संस्थांचे दुरध्वनी क्रमांक मिळवून अद्यावत करा, असे ते म्हणाले. पाटबंधारे विभागाने धरणाच्या पाण्याच्या पातळीची माहिती अद्यावत ठेवावी. तसेच धरणाची दुरुस्ती करावी. आरोग्य विभागाने साथीचे रोग व इतर आपत्तीविषयक काळजी घ्यावी. विद्युत विभागाने जबाबदारीने आपले काम करावे कारण आपत्तीच्या वेळी विजेच्या धक्कयाने मरणाºयांचे प्रमाण जास्त असते. मानवी अतिक्रमाणामुळे निसगार्चा ºहास होतो. त्यामुळेच आपत्ती मोठया प्रमाणात घडते, असे ते म्हणाले. पुरग्रस्त भागातील नियोजनासाठी शाळा व इतर स्थळे तयार ठेवावी. अग्नीशमन यंत्रणा या काळात सज्ज ठेवा, नगर परिषदेने याकडे द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या. आरोग्य विभागातर्फे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून हा कक्ष २४ जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे.या बैठकीला पोलीस, वन, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन, आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, कृषि, मत्स्यव्यवसाय, नगरपरिषद, वीज वितरण कंपनी, उपप्रादेशिक परिवहन, राज्यमार्ग परिवहन, दूरसंचार, भूमी अभिलेख, पाटबंधारे, अन्न पुरवठा तसेच इतरही विभागाचा आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा घेण्यात आला.
आपत्ती व्यवस्थापनाबाबत नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:22 IST
नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या मृत्युपेक्षा अयोग्य नियोजनामुळे मरणाºया व्यक्तींची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता पासून सर्व विभागाने योग्य नियोजन केल्यास होणारी आपत्ती टाळता येईल. जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांत पाणी शिरुन मनुष्यहानी, पशुहानी तसेच वित्तहानी, शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्ता नाकारता येत नाही.
आपत्ती व्यवस्थापनाबाबत नियोजन करा
ठळक मुद्देनिवासी उपजिल्हाधिकारी : मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक