शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात पालकांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 06:00 IST

तुमसर तालुक्यातील आंबागड येथे स्वामी समर्थ आदिवासी अनुदानित माध्यमिक निवासी शाळा आहे. शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये दहावीमध्ये ३४ विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्यात १७ मुले व १७ मुलींचा समावेश आहे. परीक्षेला आता अवघा दीड महिना शिल्लक असताना या ३४ विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासनाने परीक्षा अर्जच भरले नसल्याचे पुढे आले.

ठळक मुद्देपरीक्षा अर्जच भरले नाही : आदिवासी विकास युवा परिषदेच आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अनुदानित माध्यमिक निवासी आश्रम शाळेतील ३४ विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेचे अर्जच भरले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याची मागणी करीत अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदेच्या नेतृत्वात या विद्यार्थ्यांच्या पालकांनी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात दिवसभर ठिय्या दिला. विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कार्यालयातून उठणार नाही अशी भूमिका घेतली.तुमसर तालुक्यातील आंबागड येथे स्वामी समर्थ आदिवासी अनुदानित माध्यमिक निवासी शाळा आहे. शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये दहावीमध्ये ३४ विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्यात १७ मुले व १७ मुलींचा समावेश आहे. परीक्षेला आता अवघा दीड महिना शिल्लक असताना या ३४ विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासनाने परीक्षा अर्जच भरले नसल्याचे पुढे आले. त्यामुळे सदर ३४ आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी युवा परिषद आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे सीनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांच्या नेतृत्वात पालक येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात बुधवारी सकाळी धडकले. त्यांनी या कार्यालयात ठिय्या दिला. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांना जवळच्या शासकीय आश्रमशाळेत समायोजित करावे, विशेष बाब म्हणून परीक्षा अर्ज भरून घ्यावे, शैक्षणिक कार्यात हलगर्जी केल्याबद्दल शाळेची मान्यता कायमस्वरुपी रद्द करावी, शाळेला दंड ठोकून प्रशासकीय कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या. दरम्यान उपविभागीय अधिकारी तथा या कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी या आंदोलनाची दखल घेतली. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याचे आश्वासन दिले. मात्र आंदोलनकर्ते पालक तात्काळ परीक्षा फॉर्म भरून घेण्याच्या मागणीवर ठाम होते. वृत्त लिहिस्तोवर पालक ठिय्या देऊन होते.विलंब शुल्काचा दोन हजार बसणार भुर्दंडसंस्थेच्या दुर्लक्षितपणामुळे विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेचे अर्ज शिक्षण मंडळाकडे सादर झाले नाही. ऐन परीक्षेच्या तोंडावर हा प्रकार उघडकीस आला. आता या प्रकरणी विद्यार्थ्यांना अर्ज भरावयाचे असल्यास त्यांना विलंब शुल्क भरावे लागेल. एका विद्यार्थ्याला साधारणत: दोन हजार रुपये विलंब शुल्क भरावे लागण्याची शक्यता आहे. हा भुर्दंड आदिवासी पालकांसाठी मोठा असून यात तोडगा काढण्याची मागणी आहे.

टॅग्स :Schoolशाळा