बपेरा मार्गावरील खड्डे बनले धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:07 IST2021-02-18T05:07:02+5:302021-02-18T05:07:02+5:30
मध्य प्रदेश राज्याला जोडणाऱ्या तुमसर बपेरा राज्यमार्गाची अवस्था जीवघेणी झाली आहे. यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ...

बपेरा मार्गावरील खड्डे बनले धोकादायक
मध्य प्रदेश राज्याला जोडणाऱ्या तुमसर बपेरा राज्यमार्गाची अवस्था जीवघेणी झाली आहे. यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. २८ किमी लांब असणाऱ्या या राज्यमार्गावरून वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. राज्यमार्गाचे कडेला असणारी झुडपे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. बिनाखी ते बपेरा या गावापर्यंत राज्यमार्गावर खड्डेच खड्डे झाले आहेत.
राज्यमार्गावर खिंड पडली असल्याने वेगान धावणारी वाहने आदळत आहेत. वाहनाचे एक चाक खड्ड्यातून निघताच दुसरे चाक खड्ड्यातच राहत आहे. यामुळे खड्डे वाचविताना कमालीची कसरत करावी लागत आहे.
प्रवास करताना वाहनधारकांचे नाकीनव येत आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग गांभीर्याने घेत नाही. यामुळे नागरिकांत संताप निर्माण झाला आहे. या राज्यमार्गावर खोल खड्डे पडले आहेत. राज्य मार्ग दुरुस्तीची ओरड सुरू झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे यंत्रणेने राज्यमार्गाचे अवलोकन केले होते.