नीलगाईच्या पिलाला जीवनदान
By Admin | Updated: November 5, 2015 00:40 IST2015-11-05T00:40:36+5:302015-11-05T00:40:36+5:30
वनपरिक्षेत्रातील बीट क्रमांक ३०४ ताशाच्या पाटाजवळ कळपातून भरकटलेल्या नीलगाईच्या पिलाला परिसरातील शेतकऱ्यांनी पवनी येथील बेलघाटा वॉर्डात आणून...

नीलगाईच्या पिलाला जीवनदान
पवनी येथील घटना : ‘मैत्र’चे सर्वत्र कौतुक
पवनी : वनपरिक्षेत्रातील बीट क्रमांक ३०४ ताशाच्या पाटाजवळ कळपातून भरकटलेल्या नीलगाईच्या पिलाला परिसरातील शेतकऱ्यांनी पवनी येथील बेलघाटा वॉर्डात आणून मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन संस्था पवनीचे पदाधिकाऱ्यास माहिती दिली. असता संस्थेचे पदाधिकारी तातडीने घटनास्थळी जावून नीलगाईच्या भरकटलेल्या पिल्लास पकडून वनविभागाच्या स्वाधीन केले.
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात पवनी तालुक्यातील काही भाग समाविष्ट असल्यामुळे या राखीव जंगलात मुक्तपणे संचार करणारे अनेक वन्यजीव पाहावयास मिळतात. असेच बीट क्रमांक ३०४ मध्ये मुक्तपणे संचार करणाऱ्या नीलगाईच्या कळपातून नीलगाईचे पिल्लू भरकटल्यामुळे तो पिल्लू गावाच्या दिशेने येत असताना कुतूहल म्हणून काही शेतकऱ्यांनी त्याला गावात आणले व मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन संस्थेचे सचिव माधव वैद्य, उपाध्यक्ष महादेव शिवरकर यांना माहिती दिली.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) ए.ए. माने यांना भ्रमणध्वनीवर माहिती देऊन तातडीने बेलघाटा वॉर्डात नीलगाईचे पिल्लू असलेल्या स्थळी दाखल झाले व सदरचे पिल्ले हे जंगलातील नीलगाईचे असल्याची खात्री करून त्याला पकडून वनविभागाचे कार्यालयात वनपरिक्षेत्राधिकारी ए.ए. माने यांचे सुपूर्द केले.
त्याला सुरक्षितपणे जंगलात सुरक्षित स्थळी सोडण्याची मागणी केली. यावेळेस संस्थेचे अध्यक्ष खेमराज पचारे, उपाध्यक्ष महादेव शिवरकर, सचिव माधव वैद्य, सदस्य संघरत्न धारगावे, महेश मठीया, अमोल वाघधरे, चेतन हेडावू तसेच नीलगाईच्या पिलाला जीवनदान देण्यास मोलाचे सहकार्य करणारे भगवान सोमनाथे, मानापुरे, वनपरिक्षेत्राधिकारी माने, प्रतिक चावरे, मोरेश्वर राऊत व अन्य उपस्थित होते. (तांलुका प्रतिनिधी)