क्रीडास्पर्धांमुळे शारीरिक विकास
By Admin | Updated: December 26, 2016 01:01 IST2016-12-26T01:01:37+5:302016-12-26T01:01:37+5:30
चांगल्या अन्नाद्वारे निरामय मानवी शरीर प्राप्त करता येते. त्याचप्रमाणे व्यायाम व क्रीडाप्रकाराने शरीर बलवर्धक बनविता येते.

क्रीडास्पर्धांमुळे शारीरिक विकास
शाहीद कुरैशी यांचे प्रतिपादन : कटकवार विद्यालयात क्रीडासत्राला प्रारंभ
साकोली : चांगल्या अन्नाद्वारे निरामय मानवी शरीर प्राप्त करता येते. त्याचप्रमाणे व्यायाम व क्रीडाप्रकाराने शरीर बलवर्धक बनविता येते. क्रीडेमुळे शारीरिक कार्यक्षमतेचा विकास होतो. म्हणजेच एखादे काम केल्यानंतरही थकवा न येणे किंवा आलेला थकवा लवकर नष्ट होणे व अधिक सहनशक्ती निर्माण होते असे प्रतिपादन क्रीडासंघटक शाहीद कुरैशी यांनीकेले. कटकवार विद्यालयात आयोजित आंतरशालेय क्रीडासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
क्रीडासत्राच्या उद्घाटनप्रसंगी वरिष्ठ शिक्षक हिवराज येरणे, प्रा.उत्तम गायधने, प्रा.संजय पारधी, शिवदास लांजेवार, बाळकृष्ण लंजे, क्रीडासंघटक शाहीद कुरैशी, क्रीडाशिक्षक संजय भेंडारकर उपस्थित होते. वर्ग ५ ते १२ कला व विज्ञान विभागाच्या मुलामुलींच्या कबड्डी खोखो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. हिवराज येरणे यांनी याप्रसंगी सांगितले की, क्रीडास्पर्धा हा सामाजिक एकतेचा व जनसमुदाय गोळा करण्याचा चांगला मार्ग आहे. म्हणून अशा स्पर्धाचे आयोजन होणे गरजेचे आहे. या स्पर्धेचे पंच म्हणून शिवपाल चन्ने, भोजराम मांदाळे, दिनेश उईके, विठ्ठल सुकारे, सोनवाने, सुनिल मोहनकर, प्रा.विनोद हातझाडे, प्रा.केशव कापगते, प्रा.प्रशांत शिवणकर, प्रा.भालेराव, प्रा.लांजेवार यांनी काम पाहिले. विजयी उपविजयी संघाचे कौतूक संस्थासचिव विद्या कटकवार यांनी केले.